Marathi Ukhane
लग्नसराई सुरु झाली की लगेच आठवण येते ती उखाण्यांची.
नवरदेव आणि नवरीच्या डोक्यात लग्ना व्यतिरिक्त एक वेगळंच टेन्शन असतं, उखाणी कोणती घ्यायची?
चांगली उखाणी (Marathi Ukhane) घ्यायला हवी कारण सोहळ्याच्या दिवशी नाव घे – नाव घे म्हणून आग्रह करणारे खूप लोक असतात.
आता त्यांचा आग्रह पूर्ण तर करावाच लागणार ना!
चारचौघात उखाणे घ्यायचं म्हणजे ते तेवढं भारी असलंच पाहिजे असे प्रत्येकाला वाटतं.
त्यामुळे एक वेगळंच दडपण नवरा नवरींवर असते. मग चांगल्या उखाण्यांची शोधाशोध सुरु होते.
उखाणे म्हणजे काय?
महाराष्ट्रामध्ये लग्न समारंभ आणि अन्य काही समारंभांमध्ये महिलांनी नाव घेण्याची प्रथा आहे.
नाव घेणे म्हणजे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे म्हणजेच आपल्या पती किंवा पत्नीचे नाव घेणे ते ही अलंकारिक आणि यमक भाषेत.
आता बहुतेक महिला आपल्या पतीच्या नावाचा सर्रास उच्चार करताना दिसून येतात.
काही तर पतीला नावानेच हाक मारतात.
परंतु पूर्वी पतीचे नाव घेण्यासाठी महिला लाजत असत.
म्हणूनच अलंकारिक भाषेत पतीचे नाव घेण्याची प्रथा रूढ झाली असावी.
या अलंकारिक भाषेत नाव घेण्याच्या पद्धतीलाच उखाणे घेणे असे म्हणतात.
महाराष्ट्रामध्ये खासकरून लग्नसमारंभांमध्ये नववधूला उखाणे घ्यायला सांगितले जाते.
नववधू लाजत लाजत अलंकारिक शब्दांत आपल्या पतीचे नाव घेते.
लग्नसमारंभ याशिवाय सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू यांसारख्या कार्यक्रमांमध्ये महिला आवर्जून उखाण्यांतून आपल्या पतीचे नाव घेतात आणि त्या क्षणाचा आनंद लुटतात.
यामध्ये काही गमतीशीर उखाणीही असतात.
नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणी (Marathi Ukhane For Female)
देवासमोर लावली समई, समईत होत्या पाच वाती
… रावांचे नाव घेते, आयुष्यभर जपेन नाती
गणपतीच्या चरणी फुले वाहते वाकून
… रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून
गळ्यात मंगळसूत्र कपाळी कुंकू
… साथीने प्रत्येक संकटांना जिंकू
… रावांसाठी आज सोडून आले माहेर
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हाच माझ्यासाठी आहेर
ब्राह्मणांच्या आणि आप्तेष्ठांच्या उपस्थितीत घातला लग्नाचा घाट
… रावांचे नाव घेते आता तरी सोडा वाट
धोनी की रोहित पुन्हा एकदा वाद पेटणार
… रावांचे नाव घेते काहीही झालं तरी यावेळी आयपीएल मुंबईच जिंकणार
ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करतो जोडीने
… रावांचे नाव घेते संसार करू गोडीने
प्राजक्ताच्या झाडाखाली पडलाय फुलांचा सडा
… रावांच्या नावाचा घातलाय हिरवा चुडा
सत्यनारायणाच्या पूजेला शोभतो आमचा जोडा
… रावांचे नाव घेते धीर धरा थोडा
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने लाभो आम्हाला सौख्य
… रावांसारखे पती मिळाले हेच माझे भाग्य
… रावांनी केसांत माझ्या गजरा माळलाय मोगऱ्याचा
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने संसार करू राजा राणीचा
केसांत माळलाय अबोली गजरा
… रावांवर सर्व मुलींच्या नजरा
त्या सगळ्यांना सांगते नीट ठेवा ध्यानी
… राव आहेत आता फक्त माझेच धनी
अंगणातील तुळशीला घालते सकाळी पाणी
… रावांचे नाव घेते त्यांच्या हृदयाची राणी
प्रेमाच्या प्रवासात लाभली … रावांची साथ
वचन देते संसार करू सुखाने घेऊन हातात हात
गोकुळासारखं सासर मिळालं अजून काय हवं
… रावांच्या जोडीने सुरु करते आयुष्य नवं
गुळाचा गोडवा अन् मोगऱ्याचा सुगंध
… रावांसोबत संसार म्हणजे स्वर्गाचा आनंद
अंगणी होती तुळस तुळशीला घालते पाणी
आधी आईवडिलांची तान्ही आता … रावांची राणी
संसाररूपी वेलीचा झुलवू आनंदाने झुला
…रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आम्हाला
गोकुळासारख्या सासरी प्रेमाचे झरे वाहती
… रावांमुळे आयुष्यात लाभली अनेक गोड़ नाती
गोकुळासारख्या सासरी वाहती प्रेमाचे झरे
… राव वरून दिसतात बरे पण नीट वागतील तेव्हा खरे
आयपीएल च्या सामन्यात पंड्या मारतो षटकार
… रावांचे नाव घेते कोणी कितीही बोलले तरी यावेळी पून्हा मुंबईच जिंकणार
झाशीवाली राणी लढली जणू घायाळ वाघीण
तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेते … रावांची कारभारीण
पहिल्यांदा जेव्हा पाहिलं यांना विसरून गेले मी भान
… रावांची अर्धांगिनी असल्याचा आहे मला आभिमान
सर्वांचे तोंड गोड़ करते ठेवून हातावर साखर थोडी
… राव आणि मी म्हणजे रामसीतेची जोडी
कपाळी कुंकू लावून केला सौभाग्यवतीचा शृंगार
… रावांच्या साथीने सुरु करते माझा संसार
सागराच्या तळाशी सापडतात अमूल्य असे मोती
… आणि मी आता आयुष्यभराचे सोबती
झाडाच्या फांदीवर होता पक्ष्यांचा थवा
देवाकडे प्रार्थना केली होती पती फक्त … रावांसारखाच हवा
मागील जन्मीची पुण्याई साठली माझ्या पदरी
गोकुळासारखे सासर मिळाले अन … राव कारभारी
प्रार्थना करताना देवाकडे मागितले मी क्षणोक्षणी
सातही जन्मी मिळावे मला … रावांसारखे धनी
लग्नाच्या मंडपी बांधले नक्षीदार तोरण
… रावांचे नाव घेते ठेवून पूर्वजांचे स्मरण
पती पत्नी हि संसाराच्या रथाची दोन चाके असतात
… राव माझ्याकडे प्रेमाने पाहतच बसतात
प्रेमाच्या वाटेवर भय ते कसले
… रावांना पाहताच हृदय देऊन बसले
नको मोठा बंगला नको मोठी कार
… राव वचन देते अब की बार आपलंच सरकार
नवरदेवासाठी बेस्ट मराठी उखाणी (Marathi Ukhane For Male)
रत्नागिरीचा हापूस नागपूरची संत्री
… आता आमच्या घरची गृहमंत्री
झाडाच्या फांदीवर होता चिमण्यांचा चिवचिवाट
प्रेमाच्या रस्त्यावर पाहत होतो … ची वाट
शंकराचे नंदी तर मूषक गणेशाची स्वारी
… च्या रूपाने आली लक्ष्मी दारी
चांदीच्या निरांजनात जळते तुपाची वात
… चे नाव घेतो आता कुठे नाही जात
आयुष्याचं कोडं सोडवल्या सुटत नाही
… ला पाहिल्यापासून दुसरीकडे लक्षच जात नाही