क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार । Kriyavisheshan Avyay va Tyache Prakar 

| |

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीमधील पुढचा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. या लेखात आपण क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार (Kriyavisheshan Avyay va Tyache Prakar) पाहणार आहोत. 

सर्वप्रथम अनुपम क्रियाविशेषण म्हणजे काय ते समजून घेऊ. 

क्रियाविशेषण अव्यय (Adverb in Marathi)

वाक्यातील क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय (Kriyavisheshan Avyay in Marathi) असे म्हणतात. हे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून अविकारी राहतात म्हणजेच त्यांच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होत नाही.

उदा. १. तो फार सुंदर गातो. 

       २. ने फार सुंदर गाते. 

       ३. ते फार सुंदर गातात. 

वरील वाक्यांमध्ये सुंदर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. हे अव्यय गाण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते परंतु लिंग, वचन, विभक्तीनुसार त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही आहे. वरील उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता. 

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक काय? 

जसे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात तसेच वाक्यातील क्रियेविषयी किंवा क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. 

क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यांमध्ये फरक इतकाच आहे कि क्रियाविशेषणामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो तर क्रियाविशेषण अव्यायामध्ये होत नाही. 

उदा. १. तो चांगला पोहतो. 

       २. ती चांगली पोहते. 

       ३. ते चांगले पोहतात. 

वरील वाक्यांमध्ये चांगलं हे क्रियाविशेषण आहे जे लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलले आहे. 

आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहू. 

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार (Kriyavisheshan Avyay va Tyache Prakar)

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पुढीलप्रमाणे. 

(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

(३) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

(४) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

(५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

(६) निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय

यातील प्रत्येक प्रकार आपण विस्तृतपणे समजून घेऊ. 

१. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी किंवा कितीवेळा घडली हे दर्शवणाऱ्या शब्दाला किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. १. मी उद्या शाळेत जाणार नाही. 

       २. सारिका दररोज मंदिरात जाते. 

वरील वाक्यांमध्ये उद्या आणि दररोज हि कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे अजून तीन उपप्रकार आहेत.

अ) कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय

ब) सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय

क) आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय 

अ) कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील क्रिया नेमकी केव्हा घडली हे दर्शवणारे शब्द म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. 

उदा.  क्षणभर, आज, उदया, आता, नंतर, हल्ली, सध्या, आधी, लगेच, जेव्हा, पुर्वी, केव्हा, दिवसा, रात्री, अवकाळी, नुकतेच इत्यादी. 

१. बाबा नुकतेच कामावर गेले. 

२. उद्या आम्ही मुंबई ला जाणार.

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

ब) सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय

जे शब्द वाक्यातील क्रियेबद्दल सातत्य दर्शवतात त्यांना सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, सर्वकाळ, दिवसभर, रात्रभर, महीनाभर, वर्षभर, अद्यापी, हमेशा, सदोदीन, आजकाल, सतत इत्यादी. 

१. तो नेहमी कामात गुंग असतो. 

२. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. 

क) आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय 

जे शब्द वाक्यातील क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात त्यांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. पुन:पुन्हा, वारंवार क्षणोक्षणी, दररोज, साल, सालो, फिरून इत्यादी. 

१. दररोज व्यायाम केला पाहिजे. 

२. तुला पुन:पुन्हा एकाच गोष्ट सांगावी लागते.

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

२. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

ज्या क्रियाविशेषणावरून एखाद्या स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. १. दरवाजा डावीकडे आहे. 

       २. पवन बाहेरून आला.

वरील वाक्यांमध्ये डावीकडे आणि बाहेरून हि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. 

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे दोन उपप्रकार आहेत. 

अ) स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय 

ब) गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय

अ) स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय 

वाक्यातील क्रिया नेमकी कोणत्या ठिकाणी घडते आहे हे दर्शवणाऱ्या शब्दाला स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 

उदा. येथे, तेथे, मागे, पुढे, वर, खाली, अलिकडे, पलिकडे, जिकडे, तीकडे, मध्ये, सभोवार, आत, बाहेर, सभोवती, सभोवताली, डावीकडे, उजवीकडे, इकडे, सर्वत्र इत्यादी. 

१. राहुल खाली बसला. 

२. ते दुकान रस्त्याच्या पलीकडे आहे. 

ब) गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय

ज्या वाक्यात क्रिया कोणत्या ठिकाणाहून घडते आहे हे दर्शवणाऱ्या शब्दाला गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा.  येथून, तेथून, मागुन, पुढून, समोरून, अलिकडून, पलीकडून, खालुन, मधून, डावीकडून उजवीकडून  बाहेरून इत्यादी. 

१. जंगलात चालत असताना समोरून वाघ आला. 

२. मी त्याला लांबून येताना पहिले. 

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

३. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील क्रिया हि कोणत्या रीतीने किंवा पद्धतीने घडते आहे हे दर्शवणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. सावकाश, जोरान, हळू, हळूहळू, पटपट, जलद, खचीत, खरोखर, फुकट, उभ्याने, अपोआप, मुद्दाम, खरोबर, खळखळ, चमचम, धापधाप, वटवट, तेवी, झटझट, झटपट, बदाबद इत्यादी. 

१. त्यांना पाहून तो झटकन उभा राहिला. 

२. तू खूप हळूहळू चालतोस. 

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

४. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील जी क्रियाविशेषणे क्रिया किती वेळा घडली किंवा तिचे परिमाण दर्शवतात त्यांना संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. थोडा, मुळीच, क्वचीत, अतिशय, बिलकुल, पूर्ण, मोजके, भरपुर, किंचीत, जास्त, अत्यंत, अगदी, कमी, जास्त, काहीसा, खुप, जरा, अर्धा इत्यादी. 

१. मला मुळीच चिंता नाही. 

२. राहुल मोजकेच शब्द बोलतो.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती

५. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील असे शब्द जे क्रियापदाला प्रश्नार्थक बनवतात त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. १. राजेश माझं एक काम करतोस का?

       २. तू उद्या गावाला जातोयस ना?

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

६. निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय

वाक्यातील ज्या क्रियाविशेषणावरून वाक्यातील निषेध किंवा नाकारात्मकतेचा बोध होतो त्याला निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. १. राहुल न चुकता व्यायाम करतो. 

       २. तो माझे ऐकेल तर ना!

मित्रानो क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार (Adverb and Their Types in Marathi) याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Shabdyogi Avyay v Tyache Prakar

Next

Leave a Comment