केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Keval Prayogi Avyay v Tyache Prakar

| |

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातींमधील शेवटचा घटक आहे केवलप्रयोगी अव्यय. (Interjection in Marathi) या लेखात आपण केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार (Keval Prayogi Avyay v Tyache Prakar) याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. वेगवेगळ्या सपर्धा परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हि माहिती तुम्हाला खूपच उपयोगी पडू शकते. 

सर्वप्रथम आपण केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय ते पाहू. 

केवलप्रयोगी अव्यय (Keval Prayogi Avyay in Marathi)

आपल्या मनातील भावना म्हणजेच दुःख, आनंद, आश्चर्य इत्यादी व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: अरेरे!, बापरे!, ओहो!, वाह!, शाब्बास! इत्यादी. 

१. अरेरे! खूपच दुर्दैवी  घडली. 

२. ओहो! किती सुंदर दृश्य आहे.

आता आपण केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार पाहू.

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार (Keval Prayogi Avyay v Tyache Prakar)

केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 

१) हर्षदर्शक 

२) शोकदर्शक

३) आश्चर्यदर्शक

४) प्रशंसादर्शक

५) संमतीदर्शक

६) विरोधदर्शक

७) तिरस्कारदर्शक

८) संबोधनदर्शक 

९) मौनदर्शक

१) हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययातून हर्ष किंवा आनंद व्यक्त होतो त्यांना हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: अहाहा, वाहवा, वा, वा-वा, ओ-हो, अहा इत्यादी.

१. अहाहा! किती सुंदर धबधबा आहे.

२. ओ-हो! येथे आल्यावर मन एकदम प्रसन्न झालं.

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

२) शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययातून शोक किंवा दुःख व्यक्त होते त्यांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ: आई ग, अं, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अरेरे इत्यादी. 

१. अरेरे! बिचाऱ्याचं खूप वाईट झालं.

२. आई ग! कसं सहन केलं असेल बिचाऱ्याने.

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

३) आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग आश्चर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो त्याला आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: ऑ, ओ, अबब, ओहो, अहाहा, बापरे, अरेच्या इत्यादी.

१. अबब! केवढे हे मोठे धरण. 

२. अरेच्या! तू इथे कसा काय?

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

४) प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग एखाद्या गोष्टीची प्रशंसा करण्यासाठी केला जातो त्याला प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: शाब्बास, छान, वाहवा, भले, ठीक, फक्कड खाशी इत्यादी. 

१. शाब्बास! तू खूप छान काम केलंस. 

२. वाह! आजचं जेवण खूप छान झालं.

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

५) संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग संमती दर्शवण्यासाठी केला जातो त्याला संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ: ठीक, बराय, जीहा, हा, अच्छा इत्यादी. 

१. ठीक आहे! तुम्ही येऊ शकता.

२. हा! तू ते घेऊन जा. 

६) विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवण्यासाठी केला जातो त्याला विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छे, छट इत्यादी

१. छेछे! असं मी काही बोललोच नाही. 

२. अहं! हे मला नाही आवडलं.

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

७) तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार दर्शवण्यासाठी केला जातो त्याला तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी इत्यादी. 

१. शी! किती घाणेरडा आहे हा. 

२. छी! मला ते नाही आवडत.

८) संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग  एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी केलं जातो त्याला संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ: अग, अरे, अगो, अहो, ए, अगा, बा, रे इत्यादी.

१. अग! जरा बाहेर ये. 

२. अरे! ऐक ना.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती 

९) मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय

ज्या केवल प्रयोगी अव्ययांमधून गप्प किंवा मौन राहण्याचा बोध होतो त्यांना मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: चुप, गुपचुप, चुपचाप, गप इत्यादी.

१. चूप! आवाज कमी कर. 

२. गप्प बस! अति होतंय तुझं. 

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

मित्रानो केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटले हे आम्हला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्या नक्की शेअर करा. 

Previous

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार । Ubhayanvayi Avyay v Tyache Prakar

काळ व त्याचे प्रकार । Kal v Tyache Prakar

Next

Leave a Comment