Kalyan Jewellers IPO in Marathi | कल्याण ज्वेलर्स आईपीओ, फक्त ८६ रुपये गुंतवा आणि बक्कळ पैसा कमवा!

| | ,

कोरोना महामारीच्या संकटामध्ये सर्वांचे आर्थिक नियोजन विस्कटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थोड़ा आटोक्यात आल्यानंतर आता हळू हळू रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

अशातच आता शेअर मार्केट मध्ये थोडेसे पैसे गुंतवून अधिक नफा मिळवण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण अजुन एक आईपीओ उघडत आहे.

भारतातील प्रसिद्ध दागिन्यांची कंपनी कल्याण ज्वेलर्स आपला नवीन आईपीओ घेऊन आले आहेत.

त्यामुळे बक्कळ पैसा कमावण्याची संधी चालून आली आहे.

कल्याण ज्वेलर्स आयपीओ (Kalyan Jewellers IPO)

या आईपीओ ची सुरुवात १६ मार्च म्हणजेच आजपासून होत आहे. तर १८ मार्च रोजी बंद होईल (Kalyan Jewellers IPO Date 2021).

त्यामुळे बरेचसे गुंतवणुकदार या संधीचे सोने करू पाहणार आहेत.

कल्याण ज्वेलर्सच्या आईपीओ साठी किंमत निश्चिती झाली आहे.

कंपनीने त्याची किंमत प्रति शेअर ८६-८७ रुपये निश्चित केली आहे (Kalyan Jewellers IPO Share Price).

१६ मार्चपासुन सुरु होऊन १८ मार्च ला संपणाऱ्या या आईपीओ मधून सुमारे ११७५ कोटी रुपये जमा करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

कोरोना काळात बाजारपेठेच्या झालेल्या आर्थिक पडझडीमुळे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याआधी हे लक्ष्य १७५० कोटी इतके होते.

कल्याण ज्वेलर्स विषयी थोडेसे (About Kalyan Jewellers)

कल्याण ज्वेलर्स ही दागिन्यांच्या व्यवसायातील नावजलेली आणि अग्रेसर कंपनी आहे.

देशातील २१ राज्यांमध्ये कंपनीचे १०७ शोरूम आहेत.

इतकेच नाही तर विदेशातही कल्याण ज्वेलर्स चे ३० शोरूम आहेत.

ही कंपनी आपला व्यवसाय अजुन वाढवण्याच्या विचारात आहे. त्यासाठी तिने आईपीओ उघडला आहे.

या संधीचा फायदा घेऊन तुम्हीही पैसे गुंतवून अधिक पैसे कमवू शकता. 

कशी करणार गुंतवणुक? (How to Invest in Kalyan Jewellers IPO)

डी मॅट खाते असल्याशिवाय बाजारात गुंतवणुक करता येत नाही.

डी मॅट खाते हे बँक खात्यासारखेच असते. बँक खात्यामधुन पैशांची देवाण घेवाण केली जाते तर डी मॅट खात्यामधुन शेयर्स ची खरेदी विक्री केली जाते.

बँक खात्यातील पैशांप्रमाणेच डी मॅट खात्यातील शेअर्स सुरक्षित राहतात.

कल्याण ज्वेलर्स ऑनलाईन खरेदी (Kalyan Jewellers Online Shopping)

जर येत्या लग्नसराईसाठी किंवा सणसमारंभात मिरवण्यासाठी लेटेस्ट डिझाईनचे दागिने ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers Online) हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या https://www.candere.com/ या शॉपिंग वेबसाईटला भेट देऊन आपण दागिने, मौल्यवान रत्ने, आणि भेटवस्तू ऑनलाईन खरेदी करू शकता.

Candere By Kalyan Jewellers Online ShoppingPin
Candere By Kalyan Jewellers for Online Shopping

कल्याण ज्वेलर्सच्या Candere या संकेतस्थळावर आपल्याला दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज पाहायला मिळतील. शिवाय आपल्याला आवडलेल्या डिझाईनचे दागिने आपण काही क्लिकमध्ये विकतही घेऊ शकता.

Previous

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

IND W vs SA W । टी -२० मालिकेआधीचा शेवटचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा भारताचा प्रयत्न

Next

Leave a Comment