जम्मू काश्मीरमध्ये ७ किलो विस्फोटक जप्त | पुलवामा आतंकवादी घटनेच्या द्वितीय स्मृतिदिनी हल्ल्याचा होता कट

| |

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली.

संपूर्ण देश शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत असतानाच आज जम्मू काश्मीर येथे सुमारे ७ किलो वजनाची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. (Jammu Police Seize 7 Kg IED)

गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षादलाच्या सतर्कतेमुळे एका दहशतवादी घटनेला आळा बसला आहे.

आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता.

त्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते.

त्या दिवसाच्या आठवणीत पूर्ण देश बुडालेला असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जम्मू पोलीस महानिरीक्षक (I.G. Jammu Police) मुकेश सिंग यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर येथे बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

त्यावरून पुलवामा हल्ला झालेल्या दिवशीच अजून एक आतंकवादी हल्ला करण्याचा कट होता असा अंदाज सुरक्षा दलांकडून वर्तवण्यात येत आहे.

परंतु गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस दल यांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर मधील सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर होती.

दरम्यान तपासणी मोहीम चालू असताना जम्मू काश्मीर बस स्टॅन्ड येथून सोहेल नावाच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याजवळ असणाऱ्या बॅगमध्ये तब्ब्ल ७ किलो विस्फोटक पदार्थ आढळून आले. त्याची चौकशी सुरु आहे.

या सर्व गोष्टींवरून अजून एक दहशतवादी घटना घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता हे दिसून येते. परंतु तितक्याच जागरूक गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेमुळे हा प्रयत्न मोडीत काढण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेऊन असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेला अजून दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे.

चौकशीनंतर हे दोन दहशतवादी ‘जैश ए महंमद’ आणि ‘लष्कर ए तोयबा’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या लोकल आउटफिटचे चीफ कमांडर असल्याची बाब समोर आली आहे

सौजन्य: ANI

Previous

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू व केरळ दौरा | करणार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन | अर्जुन रणगाडा (Arjun MBT MK-1A) होणार सैन्यात सामील

नवी उमेद!

Next

Leave a Comment