आय पी एल विजेत्या संघांची यादी | IPL All Seasons Winners List in Marathi

| |

मित्रांनो या लेखामध्ये आपण आय पी एल मधील आतापर्यंत झालेल्या सर्व हंगामातील विजेत्यांची यादी (IPL All Seasons Winners List in Marathi) पाहणार आहोत. आय पी एल म्हटलं कि डोळ्यांसमोर येते मनोरंजनाची पर्वणी, अटीतटीच्या लढती, चाहत्यांमधली चुरस, आणि अचंबित करणारं क्रिकेट. आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League). २००८ साली सुरु झालेली हि क्रिकेट ची स्पर्धा अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. आताच्या घडीला आय पी एल माहित नाही असा जगाच्या पाठीवर क्वचितच कोणीतरी असेल. आय पी एल हि क्रिकेट मधील सर्वात कठीण लीग मानली जाते. एका पेक्षा एक सरस संघ चषकासाठी स्वतःला झोकून देतात. 

२००७ साली सर्वप्रथम २० षटकांच्या सामन्याच्या विश्वचषक झाला आणि हा विश्वचषक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकला. यानंतर पुढच्याच वर्षी २००८ साली भारताने २० षटकांच्या या स्पर्धेचे म्हणजेच आय पी एल चे (IPL)आयोजन करण्यास सुरुवात केली. आठ संघांच्या प्रवेशाने सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये आता १० संघ चषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करतात. २०२३ साली या स्पर्धेचा १६ वा हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. या सोळा हंगामांमध्ये आपल्याला अनेक अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. अनेक नवीन खेळाडू उदयास आले. नवोदित खेळाडूंना स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. अनुभवी खेळाडूं कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळेच कदाचित हि स्पर्धा एव्हडी कठीण आणि लोकप्रिय आहे. 

या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ (IPL Winners in Marathi) राजस्थान रॉयल्स होता. परंतु सर्वात जास्त वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी केली आहे. या दोन्ही संघानी तब्ब्ल ५-५ वेळा या चषकावर नाव कोरले आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने २ वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. 

IPL विजेता संघांची यादी (IPL All Seasons Winners List in Marathi)

आय पी एल स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आता पर्यंत तब्बल १६ हंगाम झाले आहेत. या सर्व हंगामातील विजेत्यांची नावे आपल्याला खालील तक्त्यामध्ये पाहायला मिळतील. 

हंगामविजेता संघIPL Winning Franchise Name
२००८राजस्थान रॉयल्सRajasthan Royals
२००९डेक्कन चार्जेर्सDeccan Chargers
२०१०चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings
२०११चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings
२०१२कोलकाता नाईट रायडर्सKolkata Knight Riders
२०१३मुंबई इंडियन्सMumbai Indians
२०१४कोलकाता नाईट रायडर्सKolkata Knight Riders
२०१५मुंबई इंडियन्सMumbai Indians
२०१६सन रायझर्स हैदराबादSunrisers Hyderabad
२०१७मुंबई इंडियन्सMumbai Indians
२०१८चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings
२०१९मुंबई इंडियन्सMumbai Indians
२०२०मुंबई इंडियन्सMumbai Indians
२०२१चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings
२०२२गुजरात टायटन्सGujrat Taitans
२०२३चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings

आय पी एल हंगामातील विजेते, उपविजेते, ठिकाण आणि सामनावीर | IPL All Seasons Winners, Runner-ups, Venue & MOM

खालील तक्त्यामध्ये आय पी एल हंगामातील विजेते, (IPL Winners in Marathi) उपविजेते, अंतिम सामन्याचे ठिकाण आणि अंतिम सामन्याचे सामनावीर यांचं तपशीलवार विश्लेषण दिलेले आहे. 

हंगामविजेता संघउपविजेता संघठिकाणसामनावीर
२००८राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्समुंबईयुसूफ पठाण 
२००९डेक्कन चार्जेर्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोर जोहान्सबर्ग अनिल कुंबळे
२०१०चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्समुंबईसुरेश रैना  
२०११चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोर चेन्नईमुरली विजय
२०१२कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सचेन्नईमनविंदर बिस्ला
२०१३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकोलकाताकिरॉन पोलार्ड
२०१४कोलकाता नाईट रायडर्सकिंग्स XI पंजाब बँगलोर मनीष पांडे
२०१५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकोलकातारोहित शर्मा 
२०१६सन रायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बँगलोर बँगलोर बेन कटिंग
२०१७मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट्स हैदराबादकृणाल पांड्या 
२०१८चेन्नई सुपर किंग्ससन रायझर्स हैदराबादमुंबईशेन वॉटसन
२०१९मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सहैदराबादजसप्रीत बुमराह 
२०२०मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सदुबईट्रेंट बोल्ट
२०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सदुबईफाफ डू प्लेसिस 
२०२२गुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सअहमदाबाद जोस बटलर 
२०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सअहमदाबाद डेवोन कॉनवें 

काही रोचक तथ्ये

प्र. १. कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल विजेतेपदे जिंकली?

सर्वात जास्त वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी केली आहे. या दोन्ही संघानी तब्ब्ल ५-५ वेळा विजेतेपद जिंकले आहे.

प्र. २. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे?

विराट कोहली हा आय पी एल मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आय पी एल मध्ये आता पर्यंत ७२६३ धाव बनवल्या आहेत. यांमध्ये ७ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. 

प्र. ३. IPL इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडू कोणता आहे ?

ख्रिस गेल हा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. त्याने एकूण ३५७ सिक्सेस मारले आहेत. 

प्र. ४. आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोणता आहे?

युझवेंद्र चहल हा आय पी एल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १८७ विकेट्स घेतल्या आहेत. 

प्र. ५. IPL मधील सर्वात यशस्वी कप्तान कोण आहे?

महेंद्रसिंग धोनी हा IPL मधील सर्वात यशस्वी कप्तान आहे. त्याने ५ वेळा विजेते तर ५ वेळा उपविजेते पद पटकावले आहे. सर्वाधिक वेळा अंतिम सामना खेळण्याचा मानही त्याच्याच नावे आहे.  

मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabdsamuha Badal Ek Shabd

भारताचे राष्ट्रगीत | Jana Gana Mana in Marathi

Next

Leave a Comment