भुवन बाम म्हणतो आता माझ्या केसाला कोणीच धक्का लावू शकत नाही, कारण…

| |


प्रसिद्ध भारतीय युट्युबर भुवन बाम इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत ‘आता माझ्या केसाला कोणीही धक्का पोहोचवू शकत नाही’ असे म्हटले आहे. (Bhuvan Bam Says Nobody Can Touch My Hair)

भुवन बाम ने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आहे.

या फोटोमध्ये तो एका नव्या अवतारात आपल्या चाहत्यांच्या भेटीला आहे.

त्याने आपले केस कापले आहेत आणि पूर्ण टक्कल केलं आहे.

त्याच्या चाहत्यांसाठी हे एक प्रकारचं सरप्राईझच आहे.

भुवन बाम म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो मानेपर्यंत लांब केस असलेला चेहरा.

परंतु भुवन बामने आता पूर्णपणे टक्कल केलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटो ला कॅप्शन देताना त्याने म्हटले आहे की “Koi mera baal bhi baaka……oh wait

भुवन बाम हा प्रसिद्ध भारतीय युट्युबर आहे.

युट्यूब वर त्याचा ‘बीबी कि वाइन्स’ (BB Ki Vines) नावाचा चॅनेल आहे.

यामध्ये तो वेगवेगळे कॉमेडी व्हिडीओज तयार करून टाकत असतो.

आपल्या प्रचंड मेहनतीने आणि अफलातून क्रिएटिव्हिटीने त्याने स्वतःचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

युट्यूब वर त्याचे २० मिलियन पेक्षा जास्त सबस्क्राइबर आहेत.

२०१८ साली भुवन बाम १ कोटी सबस्क्राइबर संख्या पूर्ण करणारा भारतातील पहिला स्वतंत्र युट्यूब क्रिएटर बनला.

आपली ओळख असलेली लांब केसं कापून एका नव्या लुक ने त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Previous

दिशा पटानी बायोग्राफी

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० कॅमेरा

Next

Leave a Comment