आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये

| | ,

भारतामध्ये क्रिकेटचा उत्सव समजली जाणारी आयपीएल स्पर्धा लवकरच क्रिकेट रसिकांच्या भेटीला येत आहे.

बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. (BCCI Announces Schedule for Vivo IPL 2021)

क्रिकेटच्या नव्या जल्लोषाची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे.

जवळपास २ वर्षांनंतर आयपीएल मायदेशी होणार आहे.

अहमदाबाद, बंगलोर, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता ही शहरे आयपीएलचे यजमान पद भूषवण्यास सज्ज झाली आहेत.

क्रिकेटरसिकांसाठी मांदियाळी असलेल्या आयपीएलची सुरुवात ९ एप्रिल पासून होणार असल्याची घोषणा बीसीसीआय ने आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या या १४ व्या पर्वाची सुरुवातीची लढत मागील पर्वाची विजेती मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रंगणार आहे.

ही लढत चेन्नईच्या मैदानावर लढली जाणार आहे.

मुंबई इंडियन्स ने आतापर्यंत ५ वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एकदाही चषक जिंकण्यास असफल राहिली आहे.

तरीही मोठमोठया खेळाडूंच्या उपस्थितीमुळे हा सामना खूपच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

या पर्वातील खास गोष्टी

या पर्वाचे प्लेऑफ सामने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.

प्रत्येक संघ साखळी सामन्यांमध्ये (League Stage) सहापैकी चार मैदानावर खेळेल.

एकूण ५६ साखळी सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगलोर या मैदानांवर प्रत्येकी १० खेळवले जातील तर अहमदाबाद आणि दिल्ली या मैदानांवर प्रत्येकी ८ सामने खेळवण्यात येतील.

या पर्वाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्व सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील.

कोणत्याही संघाचा एकही सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवला जाणार नाही.

प्रत्येक संघाला साखळी सामन्यांदरम्यान सहापैकी चार मैदानांवर खेळण्याची संधी मिळेल.

यावेळी एकूण ११ वेळा आपल्याला एकाच दिवशी दोन सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.

त्यापैकी ६ संघांचे प्रत्येकी ३-३ असे एकूण ९ सामने तर २ संघांचे प्रत्येकी २-२ असे एकूण २ सामने दुपारच्या सत्रात खेळवण्यात येतील.

दुपारसत्रातील सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील तर सायंकाळच्या सत्रातील सामने ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील.

या स्पर्धेतील अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम वर खेवण्यात येईल.

युएई मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन मागील पर्व व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर हे पर्व भारतात आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआय ने घेतला आहे.

वेळापत्रक: आयपीएल २०२१ चे वेळापत्रक (IPL 2021 Time Table)

Previous

मराठी साहित्य संमेलनाला कोरोनाचा फटका, मे अखेर होणार संमेलन

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

Next

Leave a Comment