केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस

| | ,

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला.

देशभर व्हॅक्सिनेशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेऊन या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली होती.

तसेच या टप्प्यामध्ये पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना पहिला डोस घेण्याचे आवाहनही केले होते.

दरम्यान आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय आयुर्विमा संस्थान नागपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. (Union Minister Nitin Gadakari Received The First Dose of COVID Vaccine)

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनीही लसीचा पहिला डोस घेतला.

लस घेतेवेळीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे.

यावेळी त्यांनी सर्वाना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याचे आवाहन केले आहे.

ही लस भारतातील सीरम इन्स्टिट्यूड ने बनवली आहे.

भारताकडून जगभर ही लस पाठवली जात आहे.

आतापर्यंत २४ हून अधिक देशांना भारताने या लसीचा पुरवठा केला आहे.

कोरोना महामारी वरची आतापर्यंतची ही सर्वात प्रभावशाली लस आहे.

Previous

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजप आज करू शकते उमेदवाराची घोषणा…

सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला ५० वर्षे पूर्ण! बीसीसीआय कडून करण्यात आला सन्मान

Next

Leave a Comment