श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

| | ,

Shreya Ghoshal Announces Her Pregnancy


हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिने एक आनंदाची बातमी आपल्या दिली आहे.

तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

आपण आई होणार असल्याची बातमी तिने इंस्टाग्रामवरून दिली आहे. (Shreya Ghoshal Announces Her Pregnancy Through Instagram)

तिने आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात ती बेबी बम्प सह पाहायला मिळत आहे

“तुम्हा सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करताना शिलादित्य आणि मला खूप रोमांचित वाटत आहे. आम्ही आयुष्याच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत त्यासाठी तुम्हां सर्वांच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.” असं कॅप्शन देत तिने हि गोड़ बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

श्रेया घोषाल ही हिंदी चित्रपसृष्टीतली आघाडीची आणि नावाजलेली पार्श्वगायिका आहे.

हिंदी सोबतच तिने तमिळ, मल्याळम, मराठी यांसारख्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

तिने स्वतःच्या मधुर आवाजाने करोडो लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

श्रेया २००२ साली आलेल्या देवदास या चित्रपटात गायलेल्या गाण्यांमुळे प्रकाशझोतात आली.

तिने या चित्रपटात वयाच्या १६ व्या वर्षी महान गायक उदित नारायण यांच्यासोबत बैरी पिया हे गाणे गायले.

या गाण्याने तिला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवून दिली.

याशिवाय सिलसिला ये चाहत का, छलक छलक, मोरे पिया आणि डोला रे डोला ही गाणी गायली.

या गाण्यांसाठी तिला बेस्ट प्ले बॅक सिंगर चा नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटला होता.

२०१५ साली श्रेया उद्योगपती शिलादित्य मुखोपाध्याय सोबत विवाहबंधनात अडकली.

आता दोघांच्याही आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. असं श्रेयाने सोशल मीडियावरून सांगितले आहे.

आपण गरोदर असल्याची बातमी श्रेया घोषालने इंस्टाग्रामवरून दिली आहे.

Previous

मराठी विनोद | पोट धरून हसा!

पंतप्रधान मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर, १६ महिन्यानंतर पहिला विदेश दौरा

Next

Leave a Comment