शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabdsamuha Badal Ek Shabd

| |

मित्रांनो मराठी भाषा खरंच खूप अलौकिक आहे. एखादी गोष्ट समजावण्यासाठी काही वेळा आपल्याला अनेक शब्दांचा आधार घ्यावा लागतो तर कधी कधी एकाच शब्द पुरेसा असतो. तो एक शब्द त्या अनेक शब्दांचा अर्थ पूर्ण करतो. अशा शब्दांना शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabdsamuha Badal Ek Shabd) असे म्हणतात. आपल्या मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत. या लेखात आपण अशाच (One Word Substitution in Marathi) शब्दांची यादी पाहणार आहोत. 

‘अ’ ने सुरुवात होणारे Shabdsamuha Badal Ek Shabd

  • काहीही माहेत नसलेला : अनभिज्ञ
  • ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे : अतुलनीय 
  • जे माहीत नाही ते : अज्ञात
  • ज्याला कोणीही शत्रू नाही असा : अजातशत्रू
  • ज्याला मरण नाही असा : अमर
  • ‘भले होवो’ अशी मंगल कामना : आशीर्वाद
  • कधी जिंकला न जाणारा : अजिंक्य
  • आधी जन्म घेतलेला : अग्रज
  • अन्न देणारा: अन्नदाता
  • अग्नीची पूजा करणारा : अग्नीपूजक 
  • ज्याला अंत नाही असा : अनंत
  • ज्याला विसर पडणार नाही असा : अविस्मरणीय
  • पायात काहीही न घालणारा : अनवाणी
  • आवरता येणार  नाही असे : अनावर 
  • कधीही ज्याचं नाश नाही होत ते : अविनाशी 
  • धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण : अन्नछत्र
  • वर्णन न करता येण्यासारखा : अवर्णनीय
  • जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे : आभास
  • फार कमी बोलणारा : अबोल
  • अंग राखून काम करणारा : अंगचोर
  • ज्याचा थांग लागत नाही असे : अथांग
  • प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे : अप्रत्यक्ष
  • एखाद्याचे मागून घेणे : अनुगमन
  • थोडक्यात समाधान मानणारा : अल्पसंतुस्ट 
  • दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखे वागणे : अनुकरण
  • घरी पाहून म्हणून आलेला : अतिथी
  • देव आहे असे मानणारा : आस्तिक 
  • जे साध्य होणार नाही ते : असाध्य
  • कमी आयुष्य असलेला : अल्पजीवी
  • घरापुढील मोकळी जागा : अंगण
  • माहिती नसलेला : अज्ञानी
  • अनेक गोष्टींत एकाचवेळी लक्ष देणारा : अष्टावधानी 
  • खूप पाऊस पडणे : अतिवृष्टी
  • पाऊस मुळीच न पडणे  : अनावृष्टी,अवर्षण 
  • हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत : आसेतुहिमालय 
  • मोजता येणार नाही इतके : असंख्य ,अमाप 

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

‘उ’ ने सुरुवात होणारे

  • शिल्लक राहिलेले : उर्वरित
  • उदयाला येत असलेला : उदयोन्मुख
  • लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालणारा : उष्टावण
  • वाटेल तास पैसा खर्च करणे : उधळपट्टी
  • मर्मी लागेल असा स्वर, शब्द : उपरोध
  • नदीची सुरुवात होते ते ठिकाण : उगम
  • हळूहळू घडून येणारा बदल : उत्क्रांती  
  • सूर्योदयापूर्वीची वेळ : उष:काल
  • अगदी दुर्मिळ झालेली वस्तू / व्यक्ती : उंबराचे फूल
  • दुसऱ्यावर जिवंत राहणारा : उपजीवी
  • लक्ष न दिले गेलेले : उपेक्षित
  • ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा : उपकृत

आणखी वाचा : समानार्थी शब्द

‘क’, ‘ख’ ने सुरुवात होणारे One word Substitution in Marathi

  • कादंबरी लिहिणारा : कादंबरीकार
  • कविता करणारा : कवी
  • कामाची टाळाटाळ करणारा : कामचुकार 
  • कविता करणारी : कवियत्री
  • सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष : कल्पवृक्ष
  • अत्यंत उदार मनुष्य : कर्णाचा अवतार
  • दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा : कनवाळू 
  • धान्य साठविण्याची जागा : कोठार 
  • काही निमित्त काढून आपसांत कलह माजविणारा : कळीचा नारद
  • कलेची आवड असणारा : कलाप्रेमी
  • सतत कष्ट करणारा : कष्टाळू
  • मातीची भांडी करणारा : कुंभार
  • कार्य करण्याची जागा : कर्मभूमी
  • कड्यावरून लोटण्याची जागा : कडेलोट
  • काळोख्या रात्रीचा पंधरवडा : कृष्णपक्ष
  • कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा : कर्तव्यदक्ष
  • देवालयाचे शिखराचे टोक : कळस
  • कानाना गोड वाटणारा : कर्णमधुर
  • कार्य करण्याची जागा : कर्मभूमी 
  • आकुंचित मनाचा : कूपमंडक
  • सहसा न घडणारे : क्वचित
  • दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी : कपिलाषष्ठीचा योग
  • वयाने व अधिकाराने सर्वात कमी : कनिष्ठ
  • सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय : कामधेनू
  • सर्वांचा संहारकर्ता व क्रूर असा शत्रू : कर्दनकाळ
  • कमळाप्रमाणे डोळे असणारी : कमलाक्षी
  • कथा सांगणारा : कथेकरी
  • केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा : कृतज्ञ 
  • केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा : कृतघ्न 
  • नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश : खोरे
  • आकाशात गमन करणारा : खग
  • चैनीत, ख्याली खुशालीत दिवस घालविणारा मनुष्य : खुशालचंद
  • दोन डोंगरामधील चिंचोळी वाट : खिंड
  • निरुपयोगी माणसे किंवा वस्तू आणून केलेली भरती : खोगीर भरती

आणखी वाचा : मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

‘ग’, ‘घ’, ‘च’ ने सुरुवात होणारे

  • एकाचवेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणार आवाज : गलका
  • भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे : गहिवरणे
  • आकाशाचे भेद करणारा : गगनभेदी
  • अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती : गळ्यातील ताईत
  • वाडवडिलांचे पासून ज्यांचे घरात श्रीमंती आहे असा : गर्भश्रीमंत
  • गाणे गाणारा : गायक
  • हाताची किंवा पायाची बोटे झडून विकोपास गेलेला कृष्टरोग : गलतकुष्ट
  • दाराशी हत्ती झुलण्याइतकी संपत्ती : गजान्तलक्ष्मी
  • ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते : गाजरपारखी
  • हिंडून करावयाचा पहारा : गस्त
  • काळजात कालवाकालव झाल्यासारखे वाटणे : गलबलने
  • देवळाचा आतील भाग : गाभारा
  • नेहमी घरात बसून राहणारा : घरकोंबडा
  • बऱ्याच मोठेपणी लग्न करण्यास तयार झालेला : घोडनवरा
  • देवळाला कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा : घुमट
  • ज्याच्या हातात चक्र आहे असा : चक्रधारी, चक्रपाणी
  • शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्न : चुरस
  • नक्षत्रासारखी सुंदर स्त्री : चटकचांदणी
  • ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घर : चंद्रमौळी
  • गावाच्या कामकाजाची जागा : चावडी
  • इच्छिलेला देणारा मणी : चिंतामणी
  • मन आकर्षून घेणारा : चित्तवेधक
  • चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण : चौक
  • चित्रे काढणारा : चित्रकार
  • चार पाय असलेला : चतुष्पाद

आणखी वाचा : मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

‘ज’, ‘झ’ ने सुरुवात होणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द

  • जगाचा स्वामी : जगन्नाथ
  • जन्मापासून उपजत गुण : जन्मगुण
  • जेथे जन्म झालेला आहे तो देश : जन्मभूमी
  • जाणून घेण्याची इच्छा : जिज्ञासा 
  • थोर पुरुष, समाजसेवक, साधुसंत ह्यांच्या जन्मतिथीचा दिवस : जयंती 
  • जादूचे खेळ करून दाखवणारा : जादूगार
  • जन्मापासून कायमचा दरिद्री : जन्मदरिद्री
  • पुष्कळ जमीन असलेला : जमीनदार
  • अनेक माणसांचा समूह : जमाव
  • पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी : जलज
  • अतिशय रागीट मनुष्य : जमदग्नी
  • रत्नांचा वापर करणारा : जवाहिऱ्या
  • पाणी साठविण्यासाठी वापरात येणारे काचेचे भांडे : जार
  • ज्ञानाची इच्छा करणारा : जिज्ञासू 
  • पाण्यात राहणारे प्राणी : जलचर
  • जिवाला जीव देणारा मित्र : जिवलग
  • सतत पडणारा पाऊस : झडी
  • झाडांचा दाट समूह : झाडी
  • बाहेरून डौल न दाखवणारा पण खरोखरी गुणी मनुष्य : झाकलेला माणिक
  • नारळाच्या झाडाची पाने : झावल्या
  • दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालविलेला कारभार : झोटिंगशाही
  • तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर : झंकार

‘त’, ‘ठ’, ‘ड’ ने सुरुवात होणारे

  • खूप जोरात किंवा एकसारख्या टाळ्या वाजविणे : टाळ्यांचा कडकडाट
  • नाणी पडण्याचा कारखाना : टाकसाळ 
  • टोळासारखे नासाडी करत उगाच हिंडणारे : टोळभैरव 
  • लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणारा : ठकसेन
  • डोंगराच्या माथ्यावरील सपाट प्रदेश : डोंगरपठार
  • डोंगरातील अरुंद मार्ग : डोंगर खिंड

आणखी वाचा : समूहदर्शक शब्द

‘, ‘‘ ने सुरुवात होणारे Marathi One Word Substitution

  • खूप दानधर्म करणारा : दानशूर 
  • देशासाठी झटणारा : देशभक्त ,देशभक्ती 
  • दुष्काळात सापडलेले : दुष्काळग्रस्त
  • दोनदा जन्मलेला : व्दिज
  • हट्टीपणा करणारा : दुराग्रही
  •  खूप आयुष्य असणारा : दीर्घायुषी
  • सतत काम करणारा : दिर्घोद्योगी
  • अस्वलाचा खेळ खेळणारा : दरवेशी 
  • दैवावर हवाला ठेवून वागणारा : दैववादी
  • धर्मस्थान करणारा : धर्मसंस्थापक 
  • कपडे धुण्याचे काम करणारा : धोबी
  • वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत : धर्मशाळा 
  • विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा : ध्येयनिष्ठ 

‘, ‘‘ ने सुरुवात होणारे Marathi One Word Substitution

  • कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा : निष्पक्षपाती 
  • कसलाही लोभ नसलेला : निर्लोभी
  • ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे : नियतकालिक
  • लाज नाही असा : निर्लज्ज
  • स्वतःचा स्वार्थ न पाहणारा : निःस्वार्थी
  • हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा : नावाडी
  • घरदार नष्ट झाले आहे असा : निर्वासित
  • स्वर्गातील इंद्राची बाग : नंदनवन
  • न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा : न्यायनिष्ठुर 
  • ईश्वराचे अस्तित्व न मानणारा : नास्तिक 
  • दुसऱ्यावर अवलंबून असणारा : परावलंबी 
  • पालन करणारा : पालक
  • आईवडील  नसलेला : पोरका 
  • पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे : पाक्षिक 
  • पुरामुळे नुकसान झालेले लोक : पूरग्रस्त 
  • पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय : पाणपोई 
  • रोग्यांची शुश्रुषा करणारी : परिचारिका
  • दुसर्यावर उपकार करणारा : परोपकारी
  • पायी चालणारा : पादचारी
  • जुन्या मातांना चिकटून राहणारा : पुराणमतवादी ,सनातनी 

आणखी वाचा : मराठी बालगीते

‘, ‘‘, ‘‘ ने सुरुवात होणारे One word Substitution in Marathi

  • दुसऱ्याच्या मनातले जाणणारा : मनकवडा 
  • दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा : मूर्तिकार 
  • मृत्यूवर विजय मिळवणारा : मृत्युजंय 
  • मोजकेच बोलणारा : मितभाषी 
  • मोजकेच आहार घेणारा : मिताहारी 
  • मुद्याला धरून असलेले : मुद्देसूद 
  • ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा : वजर
  • वाद्य वाजवणारा : वादक
  • वाडवडिलांनी मिळवलेली : वडिलोपार्जित
  • विमान चालवणारा : वैमानिक
  • बातमी आणून देणारा/देणारी : वार्ताहर
  • दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा : वृत्तनिवेदक
  • कापड विणणारा : विणकर
  • वर्षाने प्रसिध्द होणारे : वार्षिक
  • व्याख्यान देणारा : व्याख्याता
  • लग्नासाठी जमलेले लोक : वर्हाडी
  • संकटे दूर करणारा : विघ्नहर्ता
  • वाट दाखविणारा : वाटाड्या
  • शभंर वर्षे आयुष्य जगणारा : शतायुषी 
  • दगडावर कोरलेले लेख : शिलालेख
  • शेती करणारा : शेतकरी
  • दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे : षण्मासिक
  • दगडावर मूर्ती घडवणारा : शिल्पकार
  • चांदण्या रात्रीचा पंधरवडा : शुक्लपक्ष
  • कपडे शिवण्याचे काम करणारा : शिंपी
  • शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य : शेजारधर्म 
  • श्रम करून जीवन जगणारा : श्रमिक
  • श्रद्धा देऊन वागणारा : श्रद्धाळू  
  • दुसऱ्याचे भाषण ऐकणारा : श्रोता 

आणखी वाचा : भारतीय शहरे आणि त्यांची टोपण नावे

‘, ‘‘, ‘क्ष‘ ने सुरुवात होणारे Shabdsamuha Badal Ek Shabd

  • सेवा करणारा : सेवक 
  • सत्यासाठी झगडणारा : सत्याग्रही 
  •  स्वतःचे काम स्वतःच करणारा : स्वावलंबी
  • बोधपर वचन : सुभाषित 
  • स्वतःच्या हिताचा त्याग करणारा : स्वार्थत्यागी 
  • सभेत धीटपणे भाषण करणारा : सभाधीट 
  • स्वतःशी केलेले भाषण : स्वागत 
  • दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण : संगम 
  •  राजाचे बसवायचे आसन : सिहासन 
  • एखाद्या संस्थेची स्थापना करणारा : संस्थापक 
  • एकाच काळातील : समकालीन
  • सूर्य उगवण्याची घटना : सूर्योदय
  • सूर्य मावळण्याची घटना : सूर्यास्त
  • केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा : स्वार्थी
  • शोध लावणारा : संशोधक
  • दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे : साप्ताहिक
  • लाकूडकाम दरणारा : सुतार
  • सोन्याचांदीचे दागिने करणारा : सोनार
  • फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण : सदावर्त, अन्नछत्र
  • आपल्याच देशात तयार  झालेली : स्वदेशी 
  • मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व : सूत्र 
  • स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा : स्वच्छदी 
  • देशासाठी प्राण अर्पण करणारा : हुतात्मा 
  • हृदयाला जाऊन भिडणारे : हृदयंगम 
  • शत्रूकडील बातमी काढून आणणारा : हेर 
  • आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण : क्षितिज
  • क्षमा करणारी वृत्ती असणारा : क्षमाशील
  • क्षणात नष्ट होणारे : क्षणभंगुर

‘या लेखात आपण मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या शब्द समूहाबद्दल एका शब्दांची माहिती पाहिली. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

वेळेचे महत्व मराठी निबंध । Importance of Time Essay in Marathi 

आय पी एल विजेत्या संघांची यादी | IPL All Seasons Winners List in Marathi

Next

Leave a Comment