समूहदर्शक शब्द । Samuhdarshak Shabd in Marathi

| |

या लेखात आपण मराठी भाषेतील समूहदर्शक शब्द (Samuhdarshak Shabd in Marathi) पाहणार आहोत. कोणत्याही एकाच जातीचे सजीव किंवा निर्जीव एकत्र येतात तेव्हा त्यांचा समूह तयार होतो. अशा समूहाला अर्थ येण्यासाठी एक विशिष्ट शब्द वापरला जातो. अशा शब्दाला समूहदर्शक शब्द (Collective Words in Marathi) म्हणतात. त्या शब्दावरून तो समूह कोणत्या गोष्टीचा असेल याचा बोध होतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा यांमध्ये समूहदर्शक शब्दांवर (Marathi Samuhdarshak Shabd) प्रश्न विचारले जातात. बहुतेक वेळा अल्प माहितीमुळे मुले गोंधळून जातात आणि अशा सोप्या प्रश्नांची उत्तरे चुकीची देऊन मार्क गमावून बसतात. या लेखाच्या मदतीने तुम्ही या विषयावर अगदी सहजपणे पूर्ण गन मिळवू शकता. 

समूहदर्शक शब्द (Samuhdarshak Shabd in Marathi)

१. लोकांची : गर्दी, जमाव

२. लमाणांचा / उंटांचा : तांडा

३. फुलांचा : गुच्छ

४. उतारूंची : झुंड, झुंबड

५. वाळूचा : ढीग

६. तारकांचा : पूंज

७. किल्ल्यांचा : जुडगा

८. लोकप्रतींनिधीची : संसद

९. साधूंचा : जथ्था

१०. आदिवासींचा : समूह

११. पक्षांचा : थवा

१२. केळीचा : घड

१३. लतावेळीचा : कुंज

१४. मधमाशांचे : मोहोळ

१५. वारकर्‍यांची : दिंडी

१६. संतांची : मांदियाळी

१७. सैनिकांची : पलटण, तुकडी

१८. मुंग्यांची : रांग

१९. वाचकांचा : मेळावा

२०. लाकडाची : मोळी

२१. खेळाडूचा : संघ

२२. जहाजांचा : काफिला

२३. माणसांचा : घोळका

२४. वस्तूंचे : भांडार

२५. वानरांची / माकडांची : टोळी

२६. विमानांचा : ताफा

२७. महिलांचे : मंडळ

२८. दरोडेखोरांची : टोळी

२९. मेंढरांचा : कळप

३०. भाकरीची / पोळ्यांची : चवळ

३१. करवंदीची : जाळी

३२. गवताची : पेंढी, गंजी

३३. भाताची : लोंबी

३४. हत्तीचा : कळप

३५. गव्हाची : ओंबी

३६. पोत्यांची : थप्पी

३७. भक्तांची : रांग, लोंढा

३८. गुलाबांचा : ताटवा

३९. काजूंची : गाथण

४०. मडक्यांची : उतरंड

४१. फळझाडयांचे : उपवन

४२. तार्‍यांची : आकाशगंगा

४३. आंब्यांच्या झाडांची : राई 

४४. पिकलेल्या आंब्याची : अढी

४५. घोड्यांची : तुकडी

४६. पणत्यांची : माळ, आरास

४७. द्राक्षांचा : घड, घोस

४८. विचारवंतांची : परिषद

४९. केसांचा : झुबका

५०. खाटिकांची : चाळ

५१. खेचरांचे : टोळके

५२. केसांची : बट

५३. प्रश्नपत्रिकांचा : संच

५४. हरणांचा : कळप

५५. केळ्यांचा : लोंगर, घड

५६. घरांची : चाळ, आळी

५७. ढगांचे : घनमंडल

५८. नोटांचे : पुंडके

५९. कवितांचा : संग्रह

६०. विटांचा : ढिगारा

६१. उपकरणांचा : संच

६२. नावांची : यादी, सूची

६३. खारकांचा : ढीग

६४. पालेभाज्यांची : गड्डी

६५. बालवीरांचे : पथक

६६. कार्यकर्त्यांची : संघटना

६७. नारळाची : पेंड

६८. गंथप्रेमींचे : साहित्य संमेलन

६९. फळांचा : घोस

७०. कालिंगडाचा : ढीग, डोंगर

७१. धान्याची : रास

७२. फुलझाडांचा : ताटवा

७३. दूर्वाची : जुडी

७४. नाण्यांची : चळत

७५. केसांचा : पुंजका

७६. भांड्यांची : उतरंड

७७. बांबूचे : बेट

७८. मुंग्यांची : रांग

७९. विद्यार्थ्यांचा : गट

८०. प्रवाशांची : झुंबड

८१. वाद्यांचा : वृंद

८२. ऊसाची : मोळी

८३. वह्या-पुस्तकांचा : गठ्ठा

८४. वेलींचा : ताटवा, कुंज

८५. गाईगुरांचे : खिल्लार

८६. माशांची : गाथण

८७. कडब्याची : पेंढी

८८. मुलांचा : घोळका

८९. भाजीची : जुडी

समूहदर्शक शब्दांबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. हि माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवण्यास मदत करा. 

Previous

मराठी भजने । Marathi Bhajan Lyrics

आलंकारिक शब्द । Alankarik Shabd in Marathi

Next

Leave a Comment