आलंकारिक शब्द । Alankarik Shabd in Marathi

| |

आपण पाहतो कि दैनंदिन जीवनात एवढी गोष्ट किंवा गुणधर्म सांगण्यासाठी तसेच एखाद्या गोष्टीची व्याप्ती किती आहे हे सांगण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. त्यांना आलंकारिक शब्द (Alankarik Shabd in Marathi) असे म्हणतात. ज्याप्रमाणे वस्त्रे, आभूषणे, केशरचना माणसाचे सौंदर्य वाढवतात त्याचप्रमाणे आलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. फार कमी शब्दांत एखाद्या गोष्टीबद्दल सांगायचे असेल तर आलंकारिक शब्द (Marathi Alankarik Shabd) वापरले जातात. या शब्दांचा शब्दशः अर्थ बघितला तर तो पूर्णपणे वेगळा असू शकतो. त्यामुळे शाब्दिक अर्थ घेण्यापेक्षा त्यामागचा भावार्थ समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आलंकारिक शब्दांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर गैरसमज निर्माण होऊ शकतात. 

या लेखात दैनंदिन जीवनात आणि मराठी साहित्यामध्ये वापरले जाणारे काही आलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. 

आलंकारिक शब्द (Alankarik Shabd in Marathi)

१. अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२. अकलेचा कांदा : मूर्ख

३. अकलेचा खंदक : महामूर्ख

४. अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

५. अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

६. अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

७. अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला

८. अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

९. अठराविश्वे दारिद्रय : अत्यंत दारिद्रयावस्था

१०. अजातशत्रू : शत्रू नसलेला

आणखी वाचा : समूहदर्शक शब्द

११. अडेलतट्टू : अत्यंत हट्टी, आपलाच हेका चालविणारी

१२. अव्वाच्या सव्वा : आहे त्यापेक्षा जास्त सांगण्याची वृत्ती

१३. आकाशाची कुऱ्हाड : निसर्गाने आकस्मात आणलेले भयंकर संकट

१४. आळशावर गंगा : एखादे कार्य न करता झालेला लाभ

१५. आंबट द्राक्ष : मिळण्यास कठीण असलेल्या गोष्टीला नावे ठेवणे

१६. आंधळा कारभार : अंदाधुंदीचा कारभार

१७. आंधळ्याची माळ : अंधश्रद्धेने वागणाऱ्या मूर्ख लोकांची चौकडी

१८. अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

१९. अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

२०. ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द

२१. उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

२२. उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

२३. कर्णाचा अवतार : उदार माणूस

२४. कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

२५. कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा

२६. कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

२७. कुंभकर्ण : झोपाळू माणूस

२८. काडी पहिलवान : हडकुळा माणूस

२९. कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

३०. कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

आणखी वाचा : मराठी सुविचार

३१. खडास्टक : भांडण

३२. खुशालचंद : अतिशय चैनिखोर

३३. खडाजंगी : जोरदार मोठे भांडण

३४. खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

३५. गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

३६. गप्पीदास : थापा गप्पा मारणारा

३७. गंडांतर : भीतीदायक संकट

३८. गंगा यमुना : अश्रू

३९. गाढव : बेअकली माणूस

४०. गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

आणखी वाचा : समानार्थी शब्द

४१.गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

४२. गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

४३. गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य

४४. गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर

४५. घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

४६. घोरपड : चिकाटी धरणारा

४७. चरपट पंजिरी : निरर्थक बडबड

४८. चौदावे रत्न : मार

४९. चालता काळ : वैभवाचा काळ

५०. छत्तीसचा आकडा : शत्रुत्व

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

५१. जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

५२. टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे

५३. ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा

५४. थंडा फराळ : उपवास

५५. दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे

५६. दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे

५७. देवमाणूस : साधाभोळा माणूस

५८. धोपट मार्ग : सरळ मार्ग

५९. धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा

६०. धुमचश्चक्री : घनघोर युद्ध

आणखी वाचा : मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

६१. धनदांडगा : संपत्तीमुळे शेफारलेला

६२. नवकोट नारायण : खूप श्रीमंत

६३. नंदीबैल : मंदबुद्धीचा

६४. पोपटपंची : अर्थ न समजता पाठांतर करणे.

६५. पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग

६६. पोलादी पुरुष : करारी मनुष्य

६७. पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू

६८. पाताळयंत्री : कारस्तान करणारा

६९. पिंपळावरचा मुंजा : सतत भटकंती करणारा

७०. पिकले पान : म्हातारा मनुष्य

आणखी वाचा : मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

७१. पढतमूर्ख : पुस्तकी ज्ञानाने शहाणा,शिकलेला पण मूर्ख मनुष्य

७२. पराचा कावळा : एखादी गोष्ट वाढवून सांगणे,अतिशयोक्ती करणे

७३. पांढरा परीस : लबाड माणूस.

७४. पाप्याचे पितर : रोडका, सडपातळ दुबला मनुष्य

७५. पांढरे कपाळ : दुदैवीं स्त्री, वैधव्य येणे

७६. पाण्यावरील बुडबुडा : क्षणभंगूर गोष्ट

७७. पोटचा गोळा : स्वतःचे मूलबाळ

आलंकारिक शब्द (Alankarik Shabd Marathi)

७८. बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती

७९. बिन भाड्याचे घर : तुरुंग.

८०. बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य

आणखी वाचा : मराठी प्रार्थना

८१. बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन

८२. भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न

८३. भाकड कथा : बाष्कळ गोष्टी

८४. भद्रेश्वर दीक्षिती : मध्यस्थी करणे

८५. भानामती : जादू, जादूगारीण

८६. भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा

८७. भिजत घोंगडे : लांबणीवर पडलेले काम

८८. भोळा सांब : भोळा माणूस पोकळ कल्पना

८९. भाड्याचा बैल : खायला न देता कामाला जुंपलेला

९०. भरतभेट : फार काळाने झालेली दोन प्रियजनांची भेट

आणखी वाचा : मराठी बालगीते

९१. मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू

९२. मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम

९३. मृगजळ : केवळ अभास

९४. मेषपात्र : बावळट मनुष्य

९५. रुपेरी बेडी : चाकरी

९६. लंबकर्ण : बेअकली / बेअकल

९७. वाटण्याच्या अक्षता : नकार

९८. वाहती गंगा : आलेली संधी

९९. शकुनी मामा : कपटी मनुष्य

१००. सिकंदर : भाग्यवान

आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे

१०१. सिकंदर नशीब : फार मोठे नशीब

१०२. सतीसावित्री : पतिव्रता स्त्री

१०३. शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य

१०४. श्रीगणेशा : आरंभ करणे

१०५. सुलतानशाही : जुलमी कारभार

१०६. सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य

१०७. स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य

१०८. सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य

१०९. सरड्याची धाव : बुद्धीचा तोकडेपणा

११०. सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम

आणखी वाचा : महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक

१११. सूर्यवंशी : उशिरा उठणारा

११२. सशाचे शिंग : अस्तित्वात नसलेली गोष्ट

११३. सोन्याचे दिवस : चांगले दिवस

११४. रामबाण औषध : अचूक गुणकारी 

वाचकहो आलंकारिक शब्दांबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली आणि यातील कोणते शब्द आपल्याला माहित होते हे आम्हांला कंमेंट द्वारे नक्की कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

Previous

समूहदर्शक शब्द । Samuhdarshak Shabd in Marathi

मानवी शरीराच्या अवयवांची नावे । Human Body Parts Name in Marathi

Next

Leave a Comment