क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुमच्या आवडत्या निवृत्त झालेल्या क्रिकेट हिरोंना पुन्हा एकदा मैदानामध्ये चौकार षटकार मारताना पाहण्याची संधी मिळणार आहे. (Road Safety World Series 2021 Teams, Schedule, Live Telecast)
आज दिनांक ५ मार्च पासून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series) ही स्पर्धा सुरु होत आहे.
या स्पर्धेमध्ये सर्व देशांचे आपल्या कारकिर्दीत प्रभावशाली कामगिरी करून निवृत्त झालेले खेळाडू सहभागी होतात.
ही स्पर्धा सामाजिक कारणासाठी आयोजित केली जाते.
यावर्षी ही स्पर्धा ५ मार्च पासून छत्तीसगढ येथील रायपूर येथे खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने शहीद नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण हे लिजेंड्स खेळणार आहेत तर इंग्लंड संघाकडून माजी कर्णधार केविन पीटरसन ला खेळताना पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला बायोबबल मध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
याशिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही हॉटेलबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कसे आहेत संघ? (Road Safety World Series 2021 Teams)
इंडिया लेजंड्स: सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान, मोहम्मद कैफ,इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण
इंग्लंड लेजंड्स: केविन पीटरसन, ओवेस शाह, माँटी पनेसर, निक कॉम्पटन, क्रिस ट्रेमलेट, कबीर अली, साजिद महमूद, फील मस्टर्ड, क्रिस शोफिल्ड, जेम्स ट्रेडवेल, जोनाथन ट्रॉट, रियान साईडबॉटम, उस्मान अफजल, मॅथ्यू होगार्ड, जेम्स टिंडल
वेस्ट इंडिज लेजंड्स: ब्रायन लारा, पेड्रो कॉलिन्स, नरसिंह देवनारायण, टिनो बेस्ट, रिडले जेकॉब, सुलेमान बेन, दीनानाथ रामनारायण, ऍडम सॅन्फोर्ड, विलियम पार्किन्स, कार्ल हूपर, ड्वेन स्मिथ, रियान ऑस्टिन, महेंद्र नागमुथू
श्रीलंका लेजंड्स: जयसूर्या, थरांगा, दिलशान, कुलसेखरा, चमारा सिल्वा, चिंथक जयसिंघे, थिलान थुशारा, धमिका प्रसाद, हैराथ, कपुगेदरा, डुलांजन विजेसिंघे, रसेल अरनॉल्ड, अजंता मेंडिस, परवेज महारुफ, मंजूला प्रसाद, मलिंदा वर्णपुरा
साऊथ आफ्रिका लेजंड्स: जोंटी ऱ्होड्स, मखाया एंटीनी, निकी बोजे, मोर्ने वॅन वयक्, गार्नेट क्रगर, रॉजर टेलिमाचाऊस, जस्टिन केम्प, अल्विरो पीटरसन, अँड्रू पुत्तिक, थंडी शाबालाला, लुट्स बोसमन, लॉईड नॉरीस जोन्स, झेंडर डी ब्रून, मोंडे झोन्डेकी
बांग्लादेश लेजंड्स: अब्दूर रझ्झाक, खालिद महमूद, नफीस इकबाल, मोहम्मद रफिक, खालिद मशुद, हनन सरकार, जावेद ओमर, राजिन सालेह, मेहराब हुसेन, आफताब अहमद, आलमगीर कबीर, मोहम्मद शरीफ, मुशफिकूर रहमान, मामून उर राशिद
सामन्यांचे वेळापत्रक (Road Safety World Series 2021 Schedule)
- मार्च ५: इंडिया लेजंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजंड्स
- मार्च ६: श्रीलंका लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स
- मार्च ७: इंग्लंड लेजंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजंड्स
- मार्च ८: साऊथ आफ्रिका लेजंड्स विरुद्ध श्रीलंका लेजंड्स
- मार्च ९: इंडिया लेजंड्स विरुद्ध इंग्लंड लेजंड्स
- मार्च १०: बांग्लादेश लेजंड्स विरुद्ध श्रीलंका लेजंड्स
- मार्च ११: इंग्लंड लेजंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लेजंड्स
- मार्च १२: वेस्ट इंडिज लेजंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजंड्स
- मार्च १३: इंडिया लेजंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लेजंड्स
- मार्च १४: श्रीलंका लेजंड्स विरुद्ध इंग्लंड लेजंड्स
- मार्च १५: साऊथ आफ्रिका लेजंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजंड्स
- मार्च १६: इंग्लंड लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स
- मार्च १७: सेमीफायनल १
- मार्च १९: सेमीफायनल २
- मार्च २१: फायनल
सामने कोठे पाहू शकता? (Road Safety World Series 2021 Where to Watch)
या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) आणि कलर्स रिश्ते (Colors Rishtey) या चॅनेल्सवर करण्यात येणार आहे.
तसेच Voot app आणि जिओ टीव्ही वर सुद्धा यांचं प्रक्षेपण केले जाणारआहे.
सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरु होतील.