Road Safety World Series 2021। इंडिया लेजंड्स आणि श्रीलंका लेजंड्स यांच्यात रंगणार अंतिम सामना

| | ,

रायपूर छत्तीसगढ येथे सुरु असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा अंतिम सामना (Road Safety World Series 2021 Final) इंडिया लेजंड्स आणि श्रीलंका लेजंड्स यांच्यात रंगणार आहे.

इंडिया लेजंड्सने पहिल्या सेमीफायनल सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज लेजंड्सना धूळ चारली होती तर काळ झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात श्रीलंका लेजंड्सने दक्षिण आफ्रिका लेजंड्सना पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ही अंतिम लढत रविवार दिनांक २१ मार्च रोजी खेळवली जाणार आहे.

दुसऱ्या सेमीफायनल मध्ये श्रीलंकेची बाजी

तिलकरत्ने दिलशानच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या श्रीलंका लेजंड्स संघाने दमदार कामगिरी केली.

श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण आफ्रिका लेजंड्स यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगला.

या सामन्यांमध्ये श्रीलंका लेजंड्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नुवान कुलशेखराच्या तिखट माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका लेजंड्स संघाचा जास्त निभाव लागू शकला नाही.

वॅन वेयक याच्या ५३ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघ निर्धारित २० षटकांमध्ये १२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

श्रीलंकेकडून नुवान कुलशेखराने सर्वाधिक ५ बळी मिळवले.

प्रत्युत्तराची मैदानात उतरलेल्या श्रीलंका लेजंड्स संघाने सावध सुरुवात केली.

दिलशान आणि जयसूर्या बाद झाल्यानंतर थरंगा आणि जयसिंगे यांनी सावध खेळ करत सामना जिंकून दिला.

थरांगा ने ४४ चेंडूंमध्ये ३९ तर जयसिंगे ने २५ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या.

अंतिम सामना (Road Safety World Series 2021 Final)

या मालिकेतील चषकाची प्रबळ दावेदार मानला जाणारा इंडिया लेजंड्स संघ अगोदरच फायनल मध्ये पोहोचला आहे.

काल दक्षिण आफ्रिका लेजंड्स संघाला पराभूत करून श्रीलंका लेजंड्स संघाने फायनल मध्ये स्थान पटकावले आहे.

दोन्ही संघानी या मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

त्यामुळे अंतिम सामना फारच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

रविवार दिनांक २१ मार्च रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचे प्रक्षेपण सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरु होईल.

या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) आणि कलर्स रिश्ते (Colors Rishtey) या चॅनेल्सवर करण्यात येणार आहे.

तसेच Voot app आणि जिओ टीव्ही वर सुद्धा यांचं प्रक्षेपण केले जाणारआहे.

Previous

Vehicle Scrappage Policy | नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार: नितीन गडकरी

Road Safety World Series 2021 । अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत विजय, युवराज आणि युसूफ पठाण जुन्या अवतारात

Next

Leave a Comment