पंतप्रधान मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर, १६ महिन्यानंतर पहिला विदेश दौरा

| | ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कोरोना महामारीमुळे जवळपास ४९७ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही विदेश दौऱ्यावर गेले नव्हते.

परंतु येत्या २६-२७ मार्चला मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (PM Narendra Modi to Visit Bangladesh in First Post Covid Visit)

कोरोना संकटानंतरचा हा त्यांचा पहिला दौरा आहे.

बांग्लादेशचा 50 वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांग्लादेशच्या राजकीय मैत्रीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

त्यामुळे खूप दिवसानंतर होणाऱ्या या परदेश दौऱ्यावर सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

भारत – बांग्लादेश मजबूत नातेसंबंध

बांग्लादेश हा भारताचा शेजारी देश आहे.

नेबरहुड फर्स्ट और एक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारत आणि बांग्लादेश यांतील नातेसंबंध खूपच चांगले आहेत.

भारत बांग्लादेशला संकटकाळी नेहमीच मदत करत असतो.

यावेळीही कोरोना संकटकाळात ९० लाख व्हॅक्सीनचे डोस देऊन भारताने मदत केली आहे.

कोणत्याही देशाला भारताकडून देण्यात आलेली ही सर्वात जास्त डोसची संख्या आहे.

तसेच या दौऱ्या दरम्यान बांग्लादेशची राजधानी ढाका आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी दरम्यान प्रवासी लोकलला पंतप्रधान मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०२० मध्ये दौऱ्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२० मध्ये शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या व्हर्चुअल मीटिंगनंतर बांग्लादेश दौऱ्याची घोषणा केली होती.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन २०२१ मध्ये भारतात आले होते.

त्यानंतर काल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले आहेत.

कोरोना काळानंतरचा मोदी यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. याआधी ते नोव्हेंबर २०१९ ब्राझीलच्या दौऱ्यावर गेले होते.

Previous

श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

क्रिकेट लेजंड्स बॅक इन ऍक्शन! आजपासून रोड सेफ्टी सिरीज…

Next

Leave a Comment