नोरा फतेही बायोग्राफी

| |

नोरा फतेही बायोग्राफी (Nora Fatehi Biography)

नोरा फतेही… हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते एका ग्लॅमरस बोल्ड मॉडेलचं.

आपल्या सौंदर्याने करोडो तरुणांना वेड लावणारी सौंदर्यवती.

नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामधील टोरोंटो येथे झाला.

तिचं शालेय शिक्षण वेस्टव्हिव सेंटेनिअल सेकंडरी स्कूल टोरोंटो (Westview Centennial Secondary School Toronto) येथून झाले. आपलं पुढील शिक्षण तिने यॉर्क युनिव्हर्सिटी, टोरोंटो (York University, Toronto) येथून केलं.

कॅनेडियन डान्सर, मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नोराला भारतामध्ये खरी ओळख करून दिली ती भारतीय सिनेसृष्टीने.

तिच्या अप्रतिम बेल्ली डान्सिंग मुळे तिला भारतीय चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी मिळाली.

या संधीचं सोनं करत तिने फारच कमी कालावधीत भारतीय रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यास सुरुवात केली.

तिने हिंदी, तेलुगू, मल्ल्याळम, तमिळ या भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.

रोअर : द टायगर्स ऑफ सुंदरबन (Roar: Tigers of the Sundarbans.) या चित्रपटातून नोराने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

परंतु तिला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली ती ‘टेम्पर’ (Temper), ‘बाहुबली : द बीगीनिंग'(Baahubali: The Beginning ) या तेलुगू चित्रपटांमध्ये  तिने केलेल्या आयटम सॉंग्समुळे.

एखादं आयटम सॉंग करायचं म्हटलं की दिग्दर्शकांच्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते नोरा फतेही.

आपल्या नृत्याने आणि अदांनी ती गाण्याला ‘चार चांद’ लावते.

तरुण प्रेक्षकवर्गाच्या नजरा खिळवून ठेवण्याची जादू नोराला बखुबी येते. त्यामुळे आयटम सॉंग म्हटलं कि नोरा फतेही हे आता जणू एक समीकरणच झाले आहे.

‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटात तिने केलेल्या ‘दिलबर’ या गाण्यानेतर भारतीय तरुणाईला अक्षरशः वेड लावले होते. पहिल्या चोवीस तासातच हे गाणं २१ मिलिअन पेक्षा जास्त लोकांनी पहिलं  होतं .त्यामुळे हे गाणं भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहिलं गेलेलं पहिलं हिंदी गाणं ठरलं आहे.

याशिवाय तिने Double Barrel आणि Kayamkulam Kochunni या मल्ल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

नोरा फतेही बायोग्राफी (Nora Fatehi Biography)

बायोग्राफी 
पूर्ण नाव नोरा फतेही 
टोपणनाव नोरा 
व्यवसायडान्सर, अभिनेत्री, मॉडेल 
जन्मतारीख ६ फेब्रुवारी १९९२
वय (फेब्रुवारी २०२१ मध्ये)२९ वर्षे 
सोशल मीडिया इंस्टाग्राम – norafatehi
फेसबुक – norafatehi
शरीरयष्टी 
उंची (अंदाजे) १६५ सेंमीं
१.६५ मीटर 
५.५ फूट 
वजन (अंदाजे) ५५ किलोग्रॅम 
१२१ पाऊंड्स 
डोळ्यांचा रंगकाळा
केसांचा रंग काळा
वैयक्तिक आयुष्य 
जन्म ठिकाणमॉन्टरिअल, क्युबेक, कॅनडा
रास  कुंभ 
राष्ट्रीयत्वकॅनेडियन 
मूळ शहरमॉन्टरिअल, क्युबेक, कॅनडा
शाळा वेस्टव्हिव सेंटेनिअल सेकंडरी स्कूल टोरोंटो
कॉलेज यॉर्क युनिव्हर्सिटी, टोरोंटो
शैक्षणिक पात्रता पदवीधर 
पदार्पण चित्रपट: रोअर : टायगर्स ऑफ सुंदरबन  (२०१४)
कुटूंब वडील: माहित नाही
आई: माहित नाही
भाऊ: ओमर फतेही 
बहीण: माहित नाही
धर्म इस्लाम 
छंद नृत्य, अभिनय
वैवाहिक स्थितीअविवाहित 
Nora Fatehi Biography

नोरा फतेही बद्दल फार कमी लोकांना माहित असलेल्या गोष्टी… 

तसं पहायला गेलं तर नोरा फतेही हे नाव कोणाला माहित नाही असं होणार नाही.

आजच्या तरुणाईला आपल्या अदांनी भुरळ घालणारं नाव म्हणजे नोरा फतेही.

तिच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहित आहेत. 

१) तिचा जन्म एका अरेबिक मोरोक्कन कुटुंबामध्ये झाला आहे. 

२) या कुटुंबाचा भारतीय संबंध म्हणजे नोराची आई कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील भारतीय आहे. 

३) मनोरंजन क्षेत्राशी निगडित काहीतरी करण्याची नोराची शालेय जीवनापासून इच्छा होती, त्यामुळे कला क्षेत्राकडे तिचं आकर्षण निर्माण झालं आणि मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर ती आत्मविश्वासाने कला सादर करू लागली. 

४) कलाक्षेत्रात पुढे होती याचा अर्थ असा नाही की ती अभ्यासात मागे होती, अभ्यासातही ती तितकीच हुशार होती.

५) आपलं शालेय जीवन सुरु असतानाच ती एक प्रोफेशनल डान्सर बनली होती. ‘बेल्ली डान्स’ या नृत्य प्रकारात तिने विशेष प्राविण्य मिळवलं होतं. यातील विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तिने कोणतेही विशिष्ट प्रशिक्षण घेतले नव्हते, फक्त इंटरनेटवरील व्हिडीओज पाहून तिने हे प्राविण्य मिळवलं होतं. 

६) नृत्याव्यतिरिक्त तिने मॉडेलिंग या क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि ऑरेंज मॉडेल मॅनेजमेंट (Orange Model Management) या कंपनीबरोबर करार केला. या कंपनीने त्वरित करार करून तिला भारतामध्ये पाठवले. 

७) तिला हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि अरेबिक या भाषा बोलता येतात.   

८) २०१५ साली हिंदी टेलिव्हिजनच्या बिग बॉस या रिऍलिटी शो च्या ९ व्या पर्वामध्ये तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि ८४ व्या दिवशी ती या स्पर्धेतून बाहेर गेली होती. 

९) २०१६ साली ‘झलक दिख लाजा’ या हिंदी डान्स रिऍलिटी शो मध्ये ही स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. ती १० व्या नंबरवर स्पर्धेतून बाहेर गेली होती.

१०) ‘भारत’, ‘बाटला हाऊस’, ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या हिंदी चित्रपटांमधूनही तिने काम केले आहे. 

११) मधल्या काळात तिचे नाव वरिंदर घुमन, प्रिन्स नरूला, अंगद बेदी यांसारख्या सेलेब्रिटींसोबत जोडले गेले होते. 

१२) नोरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे २२ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.   

आणखी वाचा: दीपिका पदुकोण बायोग्राफी

Nora Fatehi HD Images

Nora Fatehi Glamours PictursPin
Nora Fatehi Full Hd ImagesPin
Nora Fatehi Wallpaper Hd PhotosPin
Nora Fatehi TraditionalPin
Nora Fatehi Traditional LookPin
Nora Fatehi Saree ImagesPin
Nora Fatehi Recent PictursPin
Nora Fatehi Recent PicsPin
Nora Fatehi Photos HdPin
Nora Fatehi New PicturesPin
Nora Fatehi New PicPin
Nora Fatehi New PhotosPin
Nora Fatehi New ImagesPin
Nora Fatehi Latest PicturePin
Nora Fatehi Instagram Hd PhotosPin
Nora Fatehi Hot ImagesPin
Nora Fatehi Hd WallpaperPin
Previous

हॅपी टेडी डे इमेजेस मराठी

हॅपी प्रॉमिस डे इमेजेस मराठी

Next

Leave a Comment