मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला दिनानिमित्त केले आवाहन

| | ,

आज ८ मार्च. आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

खरं तर महिलांचं कर्तृत्व, प्रत्येकाच्या आयुष्यातील त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की फक्त एक दिवसच नाही तर प्रत्येक दिवस जरी महिला दिन म्हणून साजरा केला तरी त्यांच्या महानते पुढे ते कमीच पडेल.

एक आई, एक बहीण,एक पत्नी, एक मुलगी, एक चांगली मैत्रीण अशा कितीतरी रूपात एक स्त्री आपल्या आयुष्यात मॉलचे योगदान देत असते.

ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ट्विटर करून व्हिडीओ शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (CM Udhhav Thakare Wishes Happy Womens Day)

स्त्री च्या शक्ती रूपाचे स्मरण करत तिच्या चरणी नतमस्तक होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

” महिला दिनानिमित्त आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपली माता, सहचारिणी, कन्या, भगिनी या रूपात आपली सोबत करणाऱ्या, आपल्या आयुष्यात धैर्याने साथ देणाऱ्या एक शक्तीला आपण वंदन करत असतो. महाराष्ट्र्राला जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराराणी यांसारख्या शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची परंपरा लाभली आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं त्यांना वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहेच त्याचबरोबर त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील माता भगिनींनाही वंदन करणं आपलं कर्तव्य आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटात आपल्या माता , भगिनी आणि सहचारिणीने जो आपल्याला आधार दिला त्यासोबतच कोविड योद्धया आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका यांच्या योगदानाची दाखल घेतली पाहिजे.” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्या शुभेच्छा

“आपल्या देशातील महिलांच्या अनेक कर्तृत्वांवर भारताला अभिमान आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या विस्तृत क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे हा आमच्या सरकारचा गौरव आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीला शुभेच्छा.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांनी केला महिलांचा गौरव  

शरद पवार यांनी आपल्या ट्विट द्वारे स्त्रीच्या कर्तृत्वाचा आई तिच्यातील कलागुणांचा आढावा घेत तिच्या आत्मभानाचा आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्ज: womens day 2021| womens day । international womens day । happy womens day । happy womens day 2021 । international womens day 2021 । womens day 2021 in india

आणखी वाचा: जागतिक महिला दिन इमेजेस

Previous

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

जेईई २०२१ में परीक्षेचा निकाल जाहीर, ६ जणांना १०० टक्के

Next

Leave a Comment