लिंग व त्याचे प्रकार । Ling v Tyache Prakar

| |

या लेखात आपण लिंग व त्याचे प्रकार (Ling v Tyache Prakar) याबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण लिंग म्हणजे काय ते जाणून घेऊ. 

लिंग (Gender in Marathi)

वाक्यातील नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही याचा बोध होतो त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात.

आता आपण लिंगाचे प्रकार पाहू.

लिंगाचे प्रकार (Types of Gender in Marathi)

मराठी भाषेमध्ये नामाच्या लिंगाचे तीन प्रकार आहेत.

१. पुल्लिंग

२. स्त्रीलिंग

३. नपुसकलिंग

लिंगाचे प्रकार (Ling v Tyache Prakar)

१. पुल्लिंग :

एखाद्या नामावरून जर पुरुष किंवा नर जातीचा बोध होत असेल तर त्या नामाला पुल्लिंगी नाम असे म्हणतात.

वाक्यातील पुल्लिंगी नाम ओळखायचे असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे त्या नामाला ‘तो‘ हे सर्वनाम वापरून पाहावे. जर त्या नामाला तो हे सर्वनाम योग्य असेल तर ते नाम पुल्लिंगी असते.

उदाहरणार्थ :

  • तो मुलगा
  • तो सागर
  • तो शिक्षक
  • तो चिमणा
  • तो चंद्र
  • तो घोडा
  • तो दगड
  • तो कागद
  • तो सूर्य
  • तो पंखा इ.

२. स्त्रीलिंगी :

एखाद्या नामावरून जर स्त्री किंवा मादी जातीचा बोध होत असेल तर त्या नामाला स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात.

वाक्यातील स्त्रीलिंगी नाम ओळखायचे असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे त्या नामाला ‘ती‘ हे सर्वनाम वापरून पाहावे. जर त्या नामाला ती हे सर्वनाम योग्य असेल तर ते नाम स्त्रीलिंगी असते.

उदाहरणार्थ :

  • ती मुलगी
  • ती इमारत
  • ती पाटी इ..
  • ती घोडी
  • ती शिक्षिका
  • ती खुर्ची
  • ती शाळा
  • ती नदी
  • ती चिमणी
  • ती खिडकी
  • ती वही

३. नपुसकलिंगी :

एखाद्या नामावरून जर स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नसेल तर त्या नामाला नपुसकलिंगी नाम असे म्हणतात.

वाक्यातील नपुसकलिंगी नाम ओळखायचे असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे त्या नामाला ‘ते‘ हे सर्वनाम वापरून पाहावे. जर त्या नामाला ते हे सर्वनाम योग्य असेल तर ते नाम नपुसकलिंगी असते.

उदाहरणार्थ :

  • ते पुस्तक
  • ते वाहन
  • ते घर
  • ते वासरू
  • ते घड्याळ
  • ते लेकरू
  • ते झाड
  • ते पाखरू
  • ते शहर

आता आपण लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल पाहू. 

लिंगभेद आणि नामाच्या रूपात होणारे बदल

नियम : १

काही ‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते तर त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.

उदाहरणार्थ :

  • मुलगा : मुलगी : मूलगे
  • कुत्रा : कुत्री : कुत्रे
  • पोरगा : पोरगी : पोरगे

नियम : २

काही प्राणीवाचक पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप होताना त्यांना ‘ईण’ प्रत्यय लागतो.

उदाहरणार्थ :

  • सुतार : सुतारीण
  • वाघ : वाघीण
  • माळी : माळीण
  • तेली : तेलीण

नियम : ३

काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.

उदाहरणार्थ :

  • तरुण : तरुणी
  • वानर : वानरी
  • हंस : हंसी
  • बेडूक : बेडकी

नियम : ४

काही ‘आ’ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ‘ई’ प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूपे बनतात.

उदाहरणार्थ :

  • दांडा : दांडी
  • लोटा : लोटी
  • खडा : खडी
  • आरसा : आरशी

नियम : ५

संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ‘ई’ प्रत्यय लागून होतात.

उदाहरणार्थ :

  • श्रीमान : श्रीमती
  • युवा : युवती
  • ग्रंथकर्ता : ग्रंथकर्ती

नियम : ६

काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररित्या होतात.

उदाहरणार्थ :

  • राजा : रानी
  • वर : वधू
  • बोकड : शेळी
  • पती : पत्नी
  • सासरा : सासू
  • पिता : माता
  • दीर : जाऊ
  • मोर : लांडोर

नियम : ७

मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.

उदाहरणार्थ :

  • वेळ : वेळ
  • मजा : मजा
  • वीणा : वीणा
  • बाग : बाग
  • टेकर : टेकर
  • तंबाखू : तंबाखू

नियम : ८

परभाषेतून आलेल्या काही शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.

उदाहरणार्थ :

  • बुट(जोडा) : पुल्लिंगी
  • कंपनी(मंडळी) : स्त्रीलिंगी
  • पेन्सिल (लेखनी) : स्त्रीलिंगी
  • क्लास(वर्ग) : पुल्लिंगी
  • बूक(पुस्तक) : नपुसकलिंगी

नियम : ९

सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते.

उदाहरणार्थ :

  • देवघर : नपुसकलिंगी
  • साखरभात : पुल्लिंगी
  • भाजीपाला : पुल्लिंगी
  • मिठभाकरी : स्त्रीलिंगी
  • भावूबहीण : स्त्रीलिंगी

नियम : १०

मराठी भाषेतील काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.

उदाहरणार्थ :

  • गरुड
  • उंदीर
  • मासा
  • साप
  • सुरवड
  • होळ

नियम : ११

मराठी भाषेतील काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.

उदाहरणार्थ :

  • घुस
  • पिसू

वाचकहो लिंग व त्याचे प्रकार याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

वचन व त्याचे प्रकार | Vachan v Tyache Prakar

तंबाखूचा वापर टाळण्यासाठी सामाजिक स्तरावर शिक्षकांची भूमिका

Next

Leave a Comment