पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजप आज करू शकते उमेदवाराची घोषणा…

| | ,

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उत्कर्षाच्या चरमसीमेवर असलेल्या या निवडणुकांकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

या निवडणुकांसंदर्भात एक महत्वाची बातमी हाती आली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल मधील सत्तेला भारतीय जनता पार्टीने ललकारले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पार्टी विरोधात भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

भारतीय जनता पार्टी आज त्या उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. (BJP Can Declare Their Nominees For West Bengal Assembly Elelction 2021)

पश्चिम बंगाल मध्ये २९४ जागांसाठी मतदान होणार आहे.

त्यातील २९१ जागांसाठी तृणमूल काँग्रेस ने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

भारतीय जनता पक्षाने पहिल्या दोन टप्प्यांसाठी आपल्या उमेदवाराची नावे पक्की केली आहेत.

त्या ६० नावांची घोषणा आज केली जाऊ शकते.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या यादीवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

ममता बॅनर्जींच्या विरुद्ध कोण?

सर्वात जास्त लक्ष लागून आहे ते नंदिग्रामच्या जागेवर.

नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी स्वतः रिंगणात उतरल्या आहेत.

त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोणाच्या नावाची घोषणा करतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पश्चिम बंगाल सोबतच तामिळनाडू, केरळ, आसाम, आणि पुद्दुचेरी याठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये २९४ मतदार संघात निवडणूक होणार आहेत. हे मतदान आठ टप्प्यामध्ये पार पडेल.

  • पहिला टप्पा: २७ मार्च रोजी मतदान
  • दुसरा टप्पा: १ एप्रिल रोजी मतदान
  • तिसरा टप्पा: ६ एप्रिल रोजी मतदान
  • चौथा टप्पा: १० एप्रिल रोजी मतदान
  • पाचवा टप्पा: १७ एप्रिल रोजी मतदान
  • सहावा टप्पा: २२ एप्रिल रोजी मतदान
  • सातवा टप्पा: २७ एप्रिल रोजी मतदान
  • आठवा टप्पा: २९ एप्रिल रोजी मतदान

पुद्दुचेरी ३० मतदारसंघात, तामिळनाडू मध्ये २३४ मतदारसंघात आणि केरळ मध्ये १४० मतदारसंघात एकाच टप्प्यात म्हणजेच ६ एप्रिल रोजी मतदान पार पडेल.

Previous

काहीच बदललं नाही यार! वीरेंद्र सेहवागचा पुन्हा रुद्रावतार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस

Next

Leave a Comment