अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

| | ,


हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मिथुन भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.

परंतु या चर्चाना पूर्णविराम देत मिथुनने अधिकृतरीत्या भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. (Actor Mithun Chakraborti Joins BJP at Kolkata)

त्याने नरेंद्र मोदींच्या रॅली मध्ये कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर मंचावरून भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवत आपला अधिकृत प्रवेश जाहीर केला.

यावेळी बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय उपस्थित होते.

पश्चिम बंगाल मधील विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती.

मिथुन चक्रवर्ती यांनी १६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.

नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचण्याचा काही काळ अगोदरच मिथुन चक्रवर्ती मंचावर पोहोचले होते.

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावून त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला

मिथुन चक्रवर्ती करणार कमळाचा प्रचार

२०१४ च्या राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेस कडून खासदारकी देण्यात आलेले मिथुन चक्रवर्ती यावेळी कमळ हातात घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार करताना दिसणार आहेत.

त्यामुळे त्यांची ही राजकारणातील दुसरी इंनिग आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मिथुन चक्रवर्ती याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅली मध्ये मंचावर उपस्थित पाहून ते भारतीय जनता पक्षाचाच प्रचार करणार हे निश्चित झाले होते.

दरम्यान पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरु झाला असून २७ मार्च पासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

पश्चिम बंगाल मध्ये आठ टप्प्यांमध्ये होणार मतदान

बंगालमध्ये २९४ जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे.

  • २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यात ३८ जागांसाठी
  • १ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात ३० जागांसाठी
  • ६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात ३१ जागांसाठी
  • १० एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी
  • १७ एप्रिल रोजी पाचव्या टप्प्यात ४५ जागांसाठी
  • २२ एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात ४१ जागांसाठी
  • २६ एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात ३६जागांसाठी
  • आठव्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी ३५ जागांसाठी मतदान होणार आहे.

निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागेल.

Previous

आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला दिनानिमित्त केले आवाहन

Next

Leave a Comment