सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती | Solar System Planets Information in Marathi

| |

सूर्याचा गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तुंनी बनलेल्या सौर यंत्रणेला सूर्यमाला असे म्हणतात. अशा खूप सूर्यमाला (Solar System in Marathi) अवकाशामध्ये आहेत. आपणही अशाच एका सूर्यमालेचा भाग आहोत. आपल्या सूर्यमालेत एकूण ८ मुख्य ग्रह, त्यांचे आतापर्यंत माहित असलेले एकूण १६५ चंद्र तसेच असंख्य छोट्या छोट्या वस्तूंचा समावेश आहे. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा यांचा समावेश होतो.

आता आपण प्रत्येक ग्रहाबद्दल तपशीलवार माहिती घेऊ. (Solar System Planets Information in Marathi)

परंतु सूर्यमालेमध्ये तर ९ ग्रह होते?

हो. प्लूटो ला अगोदर नवव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते. परंतु २४ ऑगस्ट २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने (International Astronomical Union) ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले.

सूर्यमालेतील ग्रहांचे प्रकार (Type of Planets in Solar System in Marathi)

आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. 

  • अंतर्ग्रह 
  • बाह्यग्रह 

अंतर्ग्रह 

सूर्यापासून जवळ आणि आकाराने थोडे लहान असणाऱ्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. यांमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा समावेश होतो. 

बाह्यग्रह 

सूर्यापासून लांब अंतरावर आणि आकाराने मोठे असणाऱ्या ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात. यांमध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्युन यांचा समावेश होतो. 

सूर्यमालेतील ग्रह (Solar System Planets Information in Marathi)

आपल्या सूर्यमालेत एकूण ८ ग्रह आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे,

  1. बुध (Mercury)
  2. शुक्र (Venus)
  3. पृथ्वी (Earth)
  4. मंगळ (Mars)
  5. गुरु (Jupiter)
  6. शनी (Saturn)
  7. युरेनस (Uranus)
  8. नेपच्यून (Neptune)

1. बुध 

Planet Mercury HD ImagesPin
Planet Mercury HD Images

बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर आहे.  तसेच तो आपल्या सौरमालेतील आकाराने सर्वात लहान ग्रह आहे. त्याचा व्यास ४८७८ किलोमीटर इतका आहे. सूर्यापासून जवळ असल्यामुळे त्याच्या पुष्ठभागाचे तापमान दिवसा खूप जास्त असते. साधारण पणे ४३० अंश सेल्सियस पर्यंत तापमान वाढते. याउलट रात्री तापमान खूपच कमी होते. बुधाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ८८ दिवसांचा कालावधी लागतो. हि प्रदक्षिणा तो ताशी १,८०,००० किलोमीटर वेगाने पार पाडतो. बुधाचा परिवलनाचा म्हणजेच स्वतःभोवती फिरण्याचा काळ ५९ दिवसांचा आहे.  

2. शुक्र 

Planet Venus HD ImagesPin
Planet Venus HD Images

शुक्र हा बुधानंतर सूर्याच्या जवळ असणारा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर १०,८२,०८,९३० कि.मी. एवढे आहे.बुधापेक्षा त्याचे आकारमान थोडे मोठे आहे. शुक्राचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. आपल्या सूर्यमालेतील जवळपास सर्व ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती भ्रमण करतात परंतु शुक्राची भ्रमणकक्षा जवळ जवळ वर्तुळाकार आहे. शुक्र हा देखील एक अंतर्ग्रह आहे त्यामुळे तो आपल्याला पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. शुक्रावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. म्हणून हा ग्रह आपल्या इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो. शुक्राला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २२५ दिवसांचा कालावधी लागतो तर स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या एक वर्षापेक्षा मोठा आहे. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र आणि युरेेेेनस हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो

3. पृथ्वी 

Planet Earth HD ImagesPin
Planet Earth HD Images

शुक्रानंतर सूर्यापासून जवळ असलेला तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीचे सूर्यापासून अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा असून आकारमानानुसार पाचवा मोठा ग्रह आहे. आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी हि अशी एकमेव ज्ञात जागा आहे जिथे जीवन आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात तर सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५ दिवस लागतात. पृथ्वी तिच्या अक्षापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि अशाच स्थितीमध्ये ती सूर्याभोवती फिरते. त्यामुळे आपल्याला पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू पाहायला मिळतात. सूर्याकडून निघालेली प्रकाशकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी ८ मिनिटे २० सेकंदाचा कालावधी लागतो. 

4. मंगळ 

Planet Mars HD ImagesPin
Planet Mars HD Images

मंगळ हा सूर्यापासून चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे. याचा समावेश अंतर्ग्रहांमध्ये केला जातो. मंगळावर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या आयर्न ऑक्साईड मुले याचा पृष्ठभाग तांबड्या रंगाचा आहे. म्हणून याला तांबडा ग्रह असे पण म्हणतात. हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळाला दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत, ‘फोबॉस’ व ‘डीमाॅस’ (उपग्रह). मंगळाचे आकारमान पृथ्वीपेक्षा फारच कमी म्हणजे फक्त १५% आहे. त्याची त्रिज्या पृथ्वी च्या निम्मी आहे तर पृथ्वी चे वस्तुमान मंगळाच्या दहा पट आहे. मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे २३ कोटी किमी एवढे आहे. त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ६८७ दिवस लागतात परंतु स्वतःभोवतीची प्रदक्षिणा तो २४ तास ३९ मिनिटांमध्ये पूर्ण करतो. 

5. गुरू 

Planet Jupiter HD ImagesPin
Planet Jupiter HD Images

गुरु हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तसेच सर्व ग्रहांमध्ये गुरु हा आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. याचे वर्गीकरण बाह्यग्रहांमध्ये केले जाते. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे. त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला गुरूला ४३३३ दिवस लागतात मात्र स्वतःभोवतीची प्रदक्षिणा तो केवळ १० तासांमध्ये पूर्ण करतो. गुरूचे वातावरण साधारणपणे ९०% हायड्रोजन व १०% हेलियमने बनलेले आहे. गुरूला लहान मोठे असे एकूण ६३ उपग्रह आहेत. 

6. शनी

Planet Saturn HD ImagesPin
Planet Saturn HD Images

शनी हा सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर असणारा ग्रह आहे. सूर्यापासून त्याचे अंतर साधारणतः १,४२६,७२५,४०० किलोमीटर एवढे आहे. तसेच गुरु नंतर आकारमानाने दुसरा मोठा ग्रह आहे.  त्याचा व्यास जवळपास १,२०,००० किमी एवढा आहे. शनीची खास ओळख म्हणजे या ग्रहाभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. सूर्याभोवती  प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शनीला २९ वर्षे लागतात. परंतु स्वतःभोवतीची प्रदक्षिणा तो केवळ १० तास १४ मिनिटांमध्ये पूर्ण करतो. शनीला एकूण ६२ उपग्रह आहेत त्यापैकी ९ हंगामी उपग्रह आहेत ज्यांची अजून निश्चिती झालेली नाही. 

7. युरेनस

Planet Uranus HD ImagesPin
Planet Uranus HD Images

युरेनस चे दुसरे नाव हर्षल असे आहे. हा सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वीपासून त्याचे सुमारे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनस हा शुक्र ग्रहाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. हा ग्रह पृथ्वी च्या तुलनेत अधिक पटींनी मोठा आहे. व्यासानुसार तो तिसरा तर वस्तुमानानुसार तो चौथा मोठा ग्रह आहे. त्याचा बराचसा भाग वायूंनी बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलियम, २% मिथेन व ॲसिटिलीनचे काही अंश आहेत.युरेनस ला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ८४ वर्षांचा कालावधी लागतो. त्याचे एकूण २७ नैसर्गिक उपग्रह आहेत. 

8. नेपच्यून

Planet Neptune HD ImagesPin
Planet Neptune HD Images

नेपच्युन हा सूर्यमालेतील आठवा आणि सूर्यापासून सर्वात दूर असणारा ग्रह आहे. सूर्यापासून याचे अंतर ४,४९८,२५२,९०० कि.मी. एवढे आहे. हा ग्रह युरेनस पासून पुढे सुमारे एक अब्ज मैल अंतरावर आहे.  नेपच्युनला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. या ग्रहाचा व्यास साधारणतः ४९,५२८ कि.मी. आहे. त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी १६५ वर्ष लागतात तर स्वतःभोवती फिरण्यासाठी १९ दिवस लागतात. सूर्यापासून सर्वात दूर असल्यामुळे या ग्रहाचे तापमान कमालीचे थंड आहे. इथल्या वातावरणात मोठ्या प्रमाणात मिथेन हा विषारी वायू आहे. नेपच्यून ग्रहास एकूण १३ चंद्र आहेत. 

या लेखात आपण सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती –  information about planets of solar system in marathi जाणून घेतली. आशा करतो ग्रहांची ही मराठी माहिती आपणास आवडली असेल या माहितीला इतरासोबत नक्की शेअर करा.

Previous

डोहाळे जेवण गाणी | Dohale Jevan Songs in Marathi

राजमाता जिजाऊ मराठी निबंध | Rajmata Jijau Essay in Marathi

Next

Leave a Comment