काहीच बदललं नाही यार! वीरेंद्र सेहवागचा पुन्हा रुद्रावतार

| | ,

काळ झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या सामन्यात सेहवागचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

चौकार षटकारांची आतिषबाजी पाहून सर्वांना जुन्या सेहवागची झलक पाहायला मिळाली.

इतक्या वर्षांनंतर सेहवागला अशी चौफेर फटकेबाजी करताना पाहून सर्वांच्या मनात आले असेलच, “काहीच बदलले नाही यार, जसा सेहवाग अगोदर होता तसाच आताही आहे.”

आपल्या ३५ चेंडूत ८० धावांच्या जबरदस्त खेळीने सेहवागने दाखवून दिले की, ‘वाघ म्हातारा झाला तरी शिकार करणे विसरत नाही.’ (India Legends Beats Bangladesh Legends, Sehwag Smashed 80 Runs in 35 Balls)

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा पहिला सामना काल इंडिया लेजंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजंड्स यांच्यात खेळवला गेला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत बांग्लादेश लेजंड्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

१९.४ षटकांत त्यांना १०९ धावाच करता आल्या.

सलामीवीर नाझीमुद्दीन याने ३३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ४९ धाव चोपल्या.

भारताकडून युवराज सिंह (२/१५), प्रज्ञान ओझा (२/१२) आणि विनय कुमार (२/२५) यांनी दमदार कामगिरी केली.

सेहवागची वादळी खेळी

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या सचिन आणि सेहवागच्या सलामी जोडीने जबरदस्त सुरुवात केली.

सेहवाग ने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत जुन्या सेहवागची आठवण करून दिली.

पहिल्याच षटकात विरून ४,४,६,०,४,१ अशा १९ धावा कुटल्या.

एकदा लय पकडली कि सेहवागला थांबवणे अशक्य असते. याचा प्रत्यय पुन्हा पाहायला मिळाला.

विरूने फक्त ३५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धाव चोपल्या.

सचिन तेंडुलकर २६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३३ धावांवर नाबाद राहिला.

सेहवागने सामन्याची सुरुवात चौकाराने तर शेवट षटकाराने केला.

दोघांनी मिळून १०.१ षटकातच ११० धावांचे उद्दिष्ट पूर्ण केले आणि भारताला एकहाती विजय मिळवून दिला.

सेहवागने मागितली सचिनची माफी!

दरम्यान सचिन आणि सेहवाग याना पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी आसुसले होते.

सेहवागने स्ट्राईक घेत बांग्लादेशी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

यातील मजेशीर गोष्ट म्हणजे इनिंग्स मधील सुरुवातीच्या दोन्ही ओव्हर सेहवागने खेळून काढल्या.

सुरुवातीच्या दोन षटकातील एकही चेंडू सचिनला खेळायला मिळाला नाही.

त्यामुळे सेहवागने त्याबद्दल सचिनची माफी मागितली.

परंतु ‘तुला फटकेबाजी करताना बघून खूप आनंद होत आहे’ अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली.

Previous

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार का? निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजप आज करू शकते उमेदवाराची घोषणा…

Next

Leave a Comment