विशेषण व त्याचे प्रकार । Visheshan Va Tyache Prakar

| |

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातींमधील अजून  महत्त्वाचा घटक म्हणजे “विशेषण.” (Adjectives in Marathi) या लेखात आपण मराठी भाषेतील विशेषणे व त्यांचे प्रकार (Visheshan Va Tyache Prakar) पाहणार आहोत. विशेषणांबद्दलची हि माहिती नक्कीच आपल्या ज्ञानात भर टाकण्याचे काम करेल. सर्वप्रथम आपण विशेषण म्हणजे काय? म्हणजेच विशेषणाची व्याख्या (Visheshan in Marathi) पाहूया. 

विशेषण (Visheshan in Marathi)

वाक्यातील असे शब्द जे त्या वाक्यात येणाऱ्या नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगतात त्यांना विशेषण असे म्हणतात. 

उदा. १. प्रियाला गोड पदार्थ खायला खूप आवडतात. 

       २. प्रवीण खूप मेहनती मुलगा आहे. 

वरील वाक्यांमध्ये गोड आणि मेहनती हि विशेषणे आहेत. 

विशेषणे ओळखण्याची एक फार सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम दिलेल्या वाक्यातील नाम किंवा सर्वनाम ओळखा . मग त्या नामाला किंवा सर्वनामाला कोण, कसे, किती, कुठे असे प्रश्न विचारा. या प्रश्नच उत्तर म्हणजे आपलं विशेषण असेल. 

वर दिलेल्या वाक्यानं जर आपण हि पद्धत वापरली तर 

१. प्रियाला कोणते पदार्थ खायला खूप आवडतात? 

उत्तर : गोड 

२. प्रवीण कसा मुलगा आहे? 

उत्तर : मेहनती 

थोडक्यात पहिल्या वाक्यामध्ये “गोड” हा शब्द पदार्थाबद्दल विशेष माहिती सांगते तर दुसऱ्या वाक्यामध्ये “मेहनती” का शब्द प्रवीण बद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणूनच “गोड” आणि “मेहनती” हि विशेषणे आहेत. 

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

विशेष्य 

दिलेल्या वाक्यामध्ये ज्या कर्ता किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष्य असे म्हणतात. 

वरील वाक्यांमध्ये प्रिया आणि प्रवीण हि विशेष्य आहेत. 

आता आपण विशेषणांची प्रकार (Types of Adjectives in Marathi) पाहू. 

विशेषणांचे प्रकार (Visheshan Va Tyache Prakar)

मराठी व्याकरणामध्ये विशेषणांची एकूण तीन प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे. 

१. गुणवाचक विशेषण

जी विशेषणे कर्त्याचे गुण म्हणजेच रंग, रूप, आकार, गुण-अवगुण दर्शवतात त्यांना गुणात्मक विशेषणे असे म्हणतात.  

उदा: १. साहिल खूप वात्रट मुलगा आहे. 

       २. कळसुबाई हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. 

वरील वाक्यांमध्ये “वात्रट” आणि “उंच” हि विशेषणे आहेत.

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

२. संख्यावाचक विशेषण 

 विशेषणे वाक्यातील नामाची संख्या दर्शवतात त्यांना संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात. 

उदा. १. त्याने दोन आंबे खाल्ले. 

       २. जंगलात खूप पशुपक्षी आहेत. 

वरील वाक्यांमध्ये “दोन” आणि “खूप” हि विशेषणे आहेत. 

संख्याविशेषणाचे पाच उपप्रकार पडतात. 

अ) गणनावाचक संख्याविशेषण 

ब) क्रमवाचक संख्याविशेषण 

क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण 

ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण 

इ) अनिश्चित संख्याविशेषण 

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

अ) गणनावाचक संख्याविशेषण 

अशी विशेषणे ज्यांचा उपयोग केवळ गणती साठी किंवा एखादी गोष्ट मोजण्यासाठी केला जातो त्यांना गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात. 

गणनावाचक विशेषणाचा अजून तीन प्रकार पडतात. 

१. पूर्णांक वाचक 

उदा. १. त्याने बारा आंबे विकत घेतले.

       २. दुकानात जाऊन दोन लीटर दूध घेऊन ये. 

वरील वाक्यांत “बारा” आणि “दोन” हि विशेषणे आहेत. 

२. अपूर्णांकवाचक 

उदा. १. काल आणलेल्या सामानामध्ये अर्धा किलो साखर कमी होती. 

        २. उद्या आम्हाला पावशेर दूध जास्त लागेल. 

वरील वाक्यांत “अर्धा” आणि “पावशेर” हि विशेषणे आहेत.

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

३. साकल्यवाचक

उदा: १. दोन्ही भाऊ आपापसात मिळूनमिसळून राहतात. 

       २. टोपलीतील पाचही आंबे खराब झाले. 

वरील वाक्यांत “दोन्ही” आणि “पाचही” हि विशेषणे आहेत.

ब) क्रमवाचक संख्याविशेषण 

अशी विशेषणे जी वाक्यातील वस्तूंचा क्रम दर्शवतात त्यांना क्रमवाचक विशेषणे असे म्हणतात. 

उदा. १. या गल्लीतील पाचवे दुकान माझ्या काकांचे आहे.

       २. आमच्या गणपती मंडळाचे हे दहावे वर्ष आहे. 

वरील वाक्यांत “पाचवे” आणि “दहावे” हि विशेषणे आहेत.

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण

जी विशेषणे एखाद्या वस्तूची किती वेळा आवृत्ती झाली आहे याबद्दल माहिती दर्शवतात त्यांना आवृत्तीवाचक संख्याविशेषणे असे म्हणतात. 

उदा. १. तुला पाहिजे त्याच्या दुप्पट पैसे मी देतो. 

       २. नुकताच आमच्या गावात नवीन चौपदरी रास्ता झाला. 

वरील वाक्यांत “दुप्पट” आणि “चौपदरी” हि विशेषणे आहेत.

ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण 

जी विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात त्यांना पृथकत्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात. 

उदा. १. सागर एकेक गोष्ट काळजीपूर्वक करतो. 

       २. काही लोकांना दहा-दहा वेळा सांगूनसुद्धा एखादी गोष्ट काळात नाही. 

वरील वाक्यांत “एकेक” आणि “दहा-दहा” हि विशेषणे आहेत.

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

इ) अनिश्चित संख्याविशेषण 

जी विशेषणे वाक्यातील वस्तूंची निश्चित अशी संख्या दर्शवत नाहीत त्यांना अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात. 

उदा. १. आम्ही सर्वजण उद्या फिरायला जाणार आहोत.

       २. तुमच्यापैकी काही जण तिकडे जा. 

वरील वाक्यांत “सर्वजण” आणि “काही” हि विशेषणे आहेत

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

3. सार्वनामिक विशेषण

सर्वनामांपासून तयार झालेल्या विशेषणांना सर्वनामिक विशेषणे असे म्हणतात. 

उदा.  १. तिथे माझे घर आहे.

        २. हे पुस्तक कोणाचे आहे?

वरील वाक्यांत “तिथे” आणि “हे” हि विशेषणे आहेत. 

४. धातुसाधित विशेषण

मराठी व्याकरणात धातूंपासून कृदंत रूपे बनतात. त्यातील काही कृदंत रूपांचा विशेषण म्हणून उपयोग केला जातो. अशा विशेषणांना धातुसाधित विशेषणे असे म्हणतात.

उदा. १. आम्ही तिथे चालत चालत गेलो. (चालणे)

       २. त्याचा चेहरा हसरा आहे. (हसणे)

वरील वाक्यांत “चालत चालत” आणि “हसरा” हि विशेषणे आहेत

आणखी वाचा : शब्दांच्या जाती 

वाचकहो विशेषणे व त्यांचे प्रकार याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

सर्वनाम व त्याचे प्रकार । Sarvanam Va Tyache Prakar

मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

Next

Leave a Comment