वर्ल्ड स्लीप डे! इतिहास आणि महत्व

| |

World Sleep Day in Marathi

झोपेचाही दिवस साजरा केला जातो तोपण जागतिक स्तरावर! ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल ना? पण हे खरं आहे.

दरवर्षी मार्च महिन्यातील तिसरा शुक्रवार हा वर्ल्ड स्लीप डे (जागतिक निद्रा दिन) म्हणून साजरा केला जातो.

आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आजकाल माणूस पैशांच्या मागे धावत आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवसरात्र झटत आहे.

स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आहे.

या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर चालत आहे.

त्यामुळे अपूर्ण झोप, निद्रानाश अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

माणसाच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम दिसून येत आहे.

त्यामुळे झोपेचे आपल्या आयुष्यातील महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातील तिसरा शुक्रवार जागतिक निद्रा दिन (World Sleep Day) म्हणून साजरा केला जातो.

वर्ल्ड स्लीप डे इतिहास (World Sleep Day History)

वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने वर्ल्ड स्लीप सोसायटी द्वारे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

योग्य झोप न घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागते.

यांच्यापासून वाचण्यासाठी आणि लोकांमध्ये पुरेशा झोपेविषयी जागरूकता आणण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटी ने या दिवसाची सुरुवात केली.

२००८ साली सर्वप्रथम वर्ल्ड स्लीप डे साजरा केला गेला.

त्यानंतर दरवर्षी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो.

या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून लोकांना पुरेशा झोपेबद्दल माहिती दिली जाते.

अपूर्ण झोपेचे शरीरावर होणारे वाईट परिणाम समजावून सांगितले जातात.

योग्य झोपेचे महत्व पटवून दिले जाते.

पुरेशा झोपेचे महत्त्व (Importance of Sleep in Marathi)

मानवी आयुष्यामध्ये पुरेशा प्रमाणातील झोप फार महत्वाची आहे.

आपण सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सतत काही ना काही करत असतो.

दिवसभराच्या कामांमुळे शरीराला थकवा येतो.

अशावेळी शरीराला योग्य विश्रांतीची गरज असते.

झोपेमुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळते.

त्यामुळे आपण पुन्हा नव्याने कमलासुरुवात करू शकतो.

परंतु ही विश्रांती पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे असते.

मानवी शरीराला चोवीस तासांपैकी किमान आठ तासांची झोप आवश्यक असते.

परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो.

स्वतःच्या आणि कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो.

बरेच जण रात्रपाळीमध्ये काम करत असतात.

त्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही.

शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही.

त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा यांमुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

थकव्यामुळे मेंदू व्यवस्थित काम करत नाही.

योग्य प्रमाणातील झोपेमुळे मेंदूलाही थोडा आराम मिळतो.

झोपेचे काही फायदे

१) योग्य प्रमाणात झोप घेतल्यामुळे शरीरातील पेशी मध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

२) अपूर्ण झोपेचा परिणाम आपल्या मज्जासंस्थेवरही होतो. ती नीट काम करत नाही. त्यामुळे हाडांसाठी उपयुक्त असलेले हार्मोन्स शरीराला मिळत नाही.

३) संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की दुपारी काही मिनिटे घेतलेली झोप स्मरणशक्ती वाढवते. परंतु झोप अपूर्ण राहिल्यास त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.

४) झोपेचा आपल्या शरीरातील हार्मोनल पातळीवर परिणाम होत असतो. योग्य झोपेमुळे त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावरील डागांवरही झोपेचा परिणाम होतो.

५) पुरेशी झोप नसेल तर त्याचा लैंगिक जीवनावरही परिणाम होतो. झोप व्यवस्थित ना झाल्यास मेंदूवर आणि शरीरावर तणाव येतो. याचा परिणाम लैंगिक जीवनावर होतो.

६) चांगली झोप घेतल्यामुळे हृदय आणि रक्तदाब सुरळीत राहण्यास मदत होते.

७) प्रौढ व्यक्तीला कमीत कमी ७ ते ८ तास झोप गरजेची असते.

Previous

Assembly Election 2021 | रामायणातील श्रीराम आता भाजप मध्ये, अभिनेते अरुण गोविल यांचा भाजप प्रवेश

Vehicle Scrappage Policy | नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार: नितीन गडकरी

Next

Leave a Comment