वंदे मातरम् | Vande Mataram in Marathi

| |

या लेखात आपण भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् (Vande Mataram in Marathi) याविषयी माहिती घेणार आहोत. जन गण मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम् हे आपले राष्ट्रीय गीत आहे. या गीताला ही राष्ट्रगीताएवढाच दर्जा प्राप्त आहे. चला तर मग वंदे मातरम् विषयी अजून काही रोचक माहिती  जाणून घेऊ. 

वंदे मातरम् (Vande Mataram in Marathi)

वंदे मातरम् (Vande Mataram Lyrics in Marathi) ही उच्च संस्कृतमय बंगाली भाषेमध्ये लिहिलेली कविता आहे. ही कविता १८७० साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली. त्यानंतर १८८२ साली त्यांनी ही कविता आनंदमठ नावाच्या बंगाली कादंबरीमध्ये समाविष्ट केली. या कवितेचे गायन सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात केले. पुढे काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर १९३७ साली म्हणजेच ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. 

१९०५ पासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक अविभाज्य भाग बनले होते. वंदे मातरम् या गीतामुळे लोकांच्या नसानसांत ऊर्जा संचारत होती. या गीतावर ब्रिटिश सरकार कडून बंदी देखील घालण्यात आली होती. परंतु १९४७ मध्ये देशाला वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने या गीतावरची बंदी हटवली. यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरम् या गीताला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले

वंदे मातरम् राष्ट्रीय गीत (Vande Mataram Lyrics in Marathi)

वंदे मातरम्
वंदे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥
वंदे मातरम्‌ ।

आणखी वाचा: भारताचे राष्ट्रगीत | Jana Gana Mana in Marathi

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले पूर्ण गीत (National Song of India in Marathi)

आपण जे राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरम् गातो ते खरं तर मूळ कवितेतील फक्त पहिले दोन श्लोक आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली मूळ कविता खालीलप्रमाणे आहे. 

वंदे मातरम्
वंदे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥
वंदे मातरम्‌ ।

कोटि – कोटि – कण्ठ कल – कल – निनाद – कराले,
कोटि – कोटि – भुजैर्धृत – खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्‌ ॥ २ ॥
वंदे मातरम्‌ ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं ही प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वंदे मातरम्‌ ।

त्वम् ही दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्‌ ॥ ४ ॥
वंदे मातरम्‌ ।

श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम्‌ ॥ ५ ॥

वंदे मातरम्‌ ।

आणखी वाचा: देशभक्तीपर गीते | Desh Bhakti Geet in Marathi

वाचकहो तुम्हांला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. 

Previous

भारताचे राष्ट्रगीत | Jana Gana Mana in Marathi

देशभक्तीपर गीते | Desh Bhakti Geet in Marathi 

Next

Leave a Comment