रतन टाटा यांची विनंती: “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा”

| |

भारतातील आघाडीचे उद्योजक आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.

अलीकडेच कोरोना काळात त्यांनी दीड हजार कोटी रुपयांची मदत करून आपला दातृत्व गुण आणि माणुसकी यांचं दर्शन घडवलं होतं.

देशाच्या विकासासाठी अशी मदत ते नेहमीच करत असतात.

त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळे टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आपुलकी आहे.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी जोर धरत आहे. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड देखील सुरु झाला होता.

सोशल मीडियावरील या जोर करणाऱ्या मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून त्यांना भारतरत्न देण्याची मोहीम थांबवण्याची विनंती केली आहे. ((Ratan Tata Requests to Stop Social Media Campaign for Bharat Ratna Award)

बिंद्रा यांच्या ट्वीटने मोहिमेची सुरुवात

रतन टाटा याना भारतरत्न देण्याची मागणी सर्वप्रथम मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी केली होती.

त्यासाठी त्यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata अशी मोहीम सुरू केली आणि लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं.

परंतु ‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे. देशाच्या विकासात आणि प्रगतीत योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.’ असं ट्वीट करत रतन टाटा यांनी ही मोहीम थांबवण्याची विनंती केली.

डॉ. विवेक बिंद्रा यांच्या ट्वीटनंतर ‘उद्योगपती रतन टाटा हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत’ असं एका वापरकर्त्याने म्हटलं आहे.

तर ‘रतन टाटा हे ‘Real Hero of India’ आहेत. आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचे खरे मानकरी आहेत’ असंही एका वापरकर्त्याने ट्वीट केलं आहे.

त्यानंतर रतन टाटा यांनी ट्वीट केलं “मला पुरस्कार मिळावा याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आपल्या भावनांचा मी आदर करतो. मी नम्र विनंती करतो कि ही मोहीम थांबवण्यात यावी. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी एक भारतीय आहे आणि भारताच्या विकास व समृद्धीसाठी प्रयत्न करत आहे.” अशा शब्दांत त्यांनी मोहीम थांबवण्याची विनंती केली.

आजारी कर्मचाऱ्याला भेटायला रतन टाटा पुण्यात

८३ वर्षीय रतन टाटा हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल प्रचंड आपुलकी आहे.

टाटा कंपनीतील एक कर्मचारी दोन वर्षांपासुन आजारी आहे, ही बातमी जेव्हा त्यांच्या कानावर आली तेव्हा ते मुंबई-पुणे असा प्रवास करत कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचले आणि त्याची आपुलकीने विचारपूस केली.

यातील विशेष बाब म्हणजे ही भेट अत्यंत गोपनीय होती. ना कोणी सुरक्षारक्षक, ना कोणी प्रसारमाध्यमं.

यातूनच त्यांचा साधेपणा आणि मनाचा मोठेपणा दिसून येतो.

त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे.

Previous

हॅपी चॉकलेट डे इमेजेस

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हाहाकार | हिमकडा कोसळून महाभयंकर हानी

Next

Leave a Comment