सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला ५० वर्षे पूर्ण! बीसीसीआय कडून करण्यात आला सन्मान

| | ,

भारताचे महान फलंदाज लिटल मास्टर सुनील गावस्कर त्यांच्या कसोटी पदार्पणाला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

याचे औचित्य साधून बीसीसीआय कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. (BCCI Honours Sunil Gavaskar on 50th Anniversary of His Iconic Test Debut Against WI)

सुनील गावस्कर हे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यामध्ये समालोचकाचे काम पाहत होते.

या सामन्यातील लंच ब्रेक मध्ये त्यांना क्रिकेट टोपी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सुनील गावस्कर यांची महानता दर्शवणारे फलकही स्टेडियम मध्ये लावण्यात आले होते.

भारताचे वरच्या फळीतील महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ५० वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच ६ मार्च १९७१ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते.

तर ७ मार्च १९८७ रोजी ते कसोटी क्रिकेट मध्ये १०००० (दहा हजार) धावा करणारे ते पहिले खेळाडू बनले.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२५ कसोटी सामने खेळले.

यामध्ये ५१.१२ अशा जबरदस्त सरासरीने त्यांनी १०१२२ धावा जमवल्या आहेत.

सुनील गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ३४ शतके आणि ४५ अर्धशतके झळकावली आहेत.

यामध्ये २३६ ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहे

सचिन तेंडुलकरने दिली मानवंदना

“५० वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांनी क्रिकेट जगतात वादळ आणले होते. त्यांनी आपल्या पदार्पणाच्या मालिकेतच ७७४ धावा बनवून आम्हा सर्वांसमोर आदर्श ठेवला. भारताने वेस्ट इंडिज आणि नंतर इंग्लंड मध्ये मालिका जिंकली आणि अचानक भारतामध्ये क्रिकेटला वेगळेच महत्व प्राप्त झाले. एक तरुण मुलगा म्हणून माझ्यासमोर एक व्यक्ती होती जिच्यासारखा बनण्याचा मी प्रयत्न करत होतो. ते अजूनही बदलले नाही. तुम्हाला क्रिकेटमधील ५० व्या वर्षाच्या शुभेच्छा.” अशा संदेशाचे ट्विट करत सचिनने आपल्या आदर्श व्यक्तीला मानवंदना दिली आहे.

आणखी वाचा: काहीच बदललं नाही यार! वीरेंद्र सेहवागचा पुन्हा रुद्रावतार

Previous

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस

टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने!

Next

Leave a Comment