काळ व त्याचे प्रकार । Kal v Tyache Prakar

| |

कोणत्याही भाषेमध्ये काळांना फार महत्त्व असते. काळाशिवाय वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. शिवाय एखाद्या घटनेचा कालखंड दर्शवण्यासाठीदेखील काळ महत्त्वाचे आहेत. ज्याप्रमाणे वाक्यातील क्रियापदावरून कोणती क्रिया घडत आहे याचा बोध होतो त्याचप्रमाणे ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध त्याला काळ (Tenses in Marathi) असे म्हणतात. या लेखात आपण मराठी भाषेतील काळ व त्याचे प्रकार (Kal v Tyache Prakar) पाहणार आहोत.

काळ व त्याचे प्रकार (Kal v Tyache Prakar)

काळाचे एकूण तीन प्रकार पडतात.

१. वर्तमानकाळ

२. भूतकाळ

३. भविष्यकाळ

प्रत्येक प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

काळ व त्याचे प्रकार (Types of Tenses in Marathi)

१. वर्तमानकाळ

वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया आता घडत आहे किंवा चालू आहे असा बोध होतो तेव्हा त्याला वर्तमान काळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी पेरू खातो.

                 २. मुले शाळेत जातात.

वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात.

अ) साधा वर्तमानकाळ

ब) अपूर्ण वर्तमानकाळ / चालू वर्तमानकाळ

क) पूर्ण वर्तमानकाळ

ड) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

अ) साधा वर्तमानकाळ

जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन ती क्रिया आता घडत आहे असा बोध होतो त्याला साधा वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. राधा चहा पिते.

                 २. सागर क्रिकेट खेळतो.

ब) अपूर्ण वर्तमानकाळ/ चालू वर्तमानकाळ

जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन ती क्रिया आता सुरु आहे परंतु ती पूर्ण झालेली नाही असा बोध होतो त्याला अपूर्ण वर्तमानकाळ किंवा चालू वर्तमानकाळ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: १. साहिल पुस्तक वाचत आहे.

                 २. प्रिया अभ्यास करत आहे.

क) पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन ती क्रिया वर्तमानकाळात नुकतीच घडली आहे असा बोध होतो त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी सफरचंद खाल्ले आहे.

                 २. राहुल झोपून उठला आहे.

ड) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा एखादी क्रिया वर्तमानकाळात घडत आहे परंतु रोज किंवा सतत घडत आहे असा बोध होतो तेव्हा त्याला रीती वर्तमानकाळ किंवा चालू पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. प्रदीप रोज अंघोळ करतो.

                २. आम्ही रोज फिरायला जातो.

२. भूतकाळ

जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन ती क्रिया यापूर्वी घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: १. मी फळे आणली.

                 २. त्याने खाऊ खाल्ला.

भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात.

अ) साधा भूतकाळ

ब) अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ

क) पूर्ण भूतकाळ

ड) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

अ) साधा भूतकाळ

जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन एखादी क्रिया काही काळापूर्वी घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला साधा भूतकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी सिनेमा पहिला.

                 २. त्याने काम केले.

ब) अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ

एखाद्या वाक्यातील क्रिया जेव्हा पूर्वीच्या काळात घडत होती किंवा चालू होती म्हणजेच ती अपूर्ण होती असा बोध होतो तेव्हा त्या काळाला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी पुस्तक वाचत होतो. 

                 २. सर्वजण आरती करत होते.

क) पूर्ण भूतकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रिया हि मागील काळात घडून गेलेली आहे किंवा पूर्ण झाली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी निबंध लिहिला होता.

                 २. त्याने  पुस्तक दिले होते.

ड) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

वाक्यातील क्रिया जेव्हा मागील काळात सतत घडत आलेली आहे आणि ती पूर्ण देखील झालेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी रोज शाळेत जात होतो.

                 २. सीता नियमित गायनाचा रियाज करत असे. 

३. भविष्यकाळ

एखाद्या वाक्यातील क्रिया जेव्हा आतापर्यंत घडलेली नाही परंतु पुढच्या काळामध्ये घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. मी मुंबईला जाईन.

                 २. मी नंतर आंबा खाईन.

भविष्यकाळाचे देखील चार उपप्रकार पडतात.

अ) साधा भविष्यकाळ

ब) अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ

क) पूर्ण भविष्यकाळ

ड) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

अ) साधा भविष्यकाळ

दिलेल्या वाक्यातील क्रिया जेव्हा पुढच्या काळामध्ये घडणार आहे असा बोध होतो त्या काळाला साधा भविष्यकाळ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: १. मी उद्या फिरायला जाईन.

                 २. उद्या सुट्टी संपेल.

ब) अपूर्ण भविष्यकाळ / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रिया भविष्यकाळामध्ये सुरु असेल किंवा पूर्ण झालेली नसेल असा बोध होतो तेव्हा त्या काळाला अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. राहुल अभ्यास करत असेल.

                 २. ओंकार पुस्तक वाचत असेल.

क) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. सागरने पुस्तक वाचले असेल.

                 २. सायलीने गाणे गायले असेल.

ड) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा दिलेल्या वाक्यातील क्रिया भविष्यकाळामध्ये सतत घडणारी असेल तर त्या काळाला रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

उदाहरणार्थ: १. सिद्धार्थ नियमित वाचन करेल.

                 २. प्रेरणा रोज शाळेत जाईल.

काळ व त्याचे प्रकार (Kal v Tyache Prakar) याबद्दल या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Keval Prayogi Avyay v Tyache Prakar

वचन व त्याचे प्रकार | Vachan v Tyache Prakar

Next

Leave a Comment