भारतीय मातीतून २४ देशांना कोविड वॅक्सिनचा पुरवठा

| | ,

मागील कित्येक महिन्यांपासून जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनावर प्रतिबंधात्मक लस बनवण्यात भारताला यश आले आहे.

एवढेच नव्हे तर भारताने बनवलेली ही लस इतकी प्रभावशाली आहे की सध्या ती २४ देशांमध्ये पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नीती आयोग (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. (India has sent COVID-19 vaccines to 24 countries)

व्हिडिओ सौजन्य: ANI News

अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिटयूटमध्ये कोविड-१९ वर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात संशोधकांना यश आले होते.

त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ही लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ही लस फक्त भारतातच नव्हे तर आतापर्यंत आणखी २४ देशांमध्ये पाठवण्यात आली आहे.

कोरोनासारख्या हाहाकार माजवणाऱ्या आजारावर लस तयार करून ती २४ देशांमध्ये वितरित करणे ही भारतासारख्या विकसनशील देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘देशात कोविड वॅक्सिनेशनची प्रक्रिया योग्य प्रकारे सुरु आहे. ज्या व्यक्तींनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोसही योग्य वेळी घ्यावा आणि या देशमोहिमेला सहकार्य करावे’, असे आवाहनही डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

Previous

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु होण्याची चिन्हे

फाफ डू प्लेसिसची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती

Next

Leave a Comment