विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd in Marathi

| |

एखाद्या स्थितीच्या विरुद्ध किंवा उलट स्थिती/अर्थ दर्शवणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. (Virudharthi Shabd in Marathi) उदा. ज्ञानी म्हणजे ज्याच्याकडे खूप ज्ञान आहे असा याचा विरुद्ध स्थिती दर्शवणारा शब्द म्हणजे अज्ञानी. अज्ञानी म्हणजे ज्याला अजिबात ज्ञान नाही असा. येथे ज्ञानी आणि अज्ञानी हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थ  दर्शवतात. म्हणून त्यांना विरुद्धार्थी शब्द किंवा उलट अर्थी शब्द (Virudharthi Shabd Marathi)असे म्हणतात. 

मराठी भाषेमधील असे अनेक उलट अर्थी शब्द दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजीमध्ये Antonyms असे म्हणतात. (Antonyms in Marathi)

या लेखात आपण अशाच मराठी भाषेतील विरुद्धार्थी शब्दांची यादी पाहणार आहोत. (List of Virudharthi Shabd in Marathi)

500+ विरुद्धार्थी शब्द (List of Virudharthi Shabd in Marathi)

काही मराठी शब्दांच्या सुरुवातीला विशिष्ट अक्षर लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. या विशिष्ट अक्षरांना ‘उपसर्ग’ असे म्हणतात. अ,अन,आव,अप,ना,नि,निर,दु:,गैर, बे,बिन,पर,वि,सु,कु इत्यादी उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. काही उलटअर्थी शब्दांना (Opposite Words in Marathi) कोणत्याही प्रकारचा उपसर्ग लागत नाही. ते दोन पूर्णपणे वेगळे शब्द असतात. 

‘अ’ उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • तुलनिय×अतुलनिय
  • नियमित×अनियमित
  • नियंत्रित×अनियंत्रित
  • प्रामाणिक×अप्रामाणिक
  • दृश्य×अदृश्य
  • न्याय×अन्याय
  • परिचित×अपरिचित
  • प्रकट×अप्रकट
  • पूर्ण×अपूर्ण
  • योग्य×अयोग्य
  • क्षम्य×अक्षम्य
  • रुंद×अरुंद
  • लौकिक×अलौकिक
  • प्रमाण×अप्रमाण
  • मूर्त×अमूर्त
  • प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष
  • मर्यादित×अमर्यादित
  • शाश्वत×अशाश्वत
  • नीती×अनीती
  • निश्चित×अनिश्चित
  • पवित्र×अपवित्र
  • कुशल×अकुशल
  • पराजित×अपराजित
  • चल×अचल
  • नित्य×अनित्य
  • प्रसन्न×अप्रसन्न
  • प्रिय×अप्रिय
  • विवाहित×अविवाहित
  • प्रशस्त×अप्रशस्त
  • विचारी×अविचारी
  • पारदर्शक×अपारदर्शक
  • पूर्णांक×अपूर्णांक
  • लिखित×अलिखित
  • प्रसिद्ध×अप्रसिद्ध
  • विस्मरणीय×अविस्मरणीय
  • समंजस×असमंजस
  • यशस्वी×अयशस्वी
  • सहकार×असहकार
  • स्वच्छ×अस्वच्छ
  • वैध×अवैध
  • विकारी×अविकारी
  • सभ्य×असभ्य
  • शक्य×अशक्य
  • समाधान×असमाधान
  • शुभ×अशुभ
  • संतोष×असंतोष
  • सत्य×असत्य
  • क्षय×अक्षय
  • साध्य×असाध्य
  • हिंसा×अहिंसा
  • साधारण×असाधारण
  • स्वस्थ×अस्वस्थ
  • सुरक्षित×असूरक्षित
  • स्थिर×अस्थीर
  • रसिक×अरसिक
  • विवेकी×अविवेकी
  • स्पृश्य×अस्पृश्य
  • समान×असमान
  • सफल×असफल
  • व्यवस्थित×अव्यवस्थित
  • शांत×अशांत
  • विभक्त×अवजभक्त
  • विश्वास×अविश्वास
  • समर्थ×असमर्थ
  • ज्ञानी×अज्ञानी
  • शुद्ध×अशुद्ध
  • स्पष्ट×अस्पष्ट
  • सामान्य×असामान्य
  • ज्ञान×अज्ञान
  • संतुष्ट×असंतुष्ट
  • ज्ञात×अज्ञात
  • सूर×असुर

आणखी वाचा: समानार्थी शब्द 

‘अन’ हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • अवधान×अनावधान
  • उदार×अनुदार
  • आवश्यक×अनावश्यक
  • अपेक्षित×अनपेक्षित
  • अनुभवी×अननुभवी
  • आवृत्त×अनावृत्त
  • आरोग्य×अनारोग्य
  • आस्था×अनास्था
  • आसक्त×अनासक्त
  • उत्तीर्ण×अनुत्तीर्ण
  • इच्छा×अनिच्छा
  • आदर×अनादर

आणखी वाचा: मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

‘गैर’,’बे’,’बिन’, ‘अव’ हे उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • हजर×गैरहजर
  • समज×गैरसमज
  • सोय×गैरसोय
  • लागू×गैरलागू
  • सावध×बेसावध
  • इमानी×बेईमानी
  • जबाबदार×बेजबाबदार
  • हिशेब×बेहिशेब
  • शिस्त×बेशिस्त
  • सुरेल ×बेसूर
  • कायदेशीर×बेकायदेशीर
  • चूक×बिनचूक
  • पगारी×बिनपगारी
  • गुणी×अवगुणी
  • कृपा×अवकृपा
  • मान×अवमान
  • गुण×अवगुण

आणखी वाचा: मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

‘ना’ हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • पास×नापास
  • खुश×नाखूश, नाराज
  • राजी×नाराजी
  • आवडता×नावडता
  • लायक×नालायक
  • पसंत×नापसंत
  • इलाज×नाईलाज
  • आवड×नावड
  • कबूल×नाकबूल
  • बाद×नाबाद
  • मर्द×नामर्द

‘नि’,’नि:’,’दु:’,हे उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • अपराधी×निरपराधी
  • उपयोगी×निरुपयोगी
  • व्यसनी×निर्व्यसनी
  • रोगी×निरोगी
  • उपाय×निरुपाय
  • संदिग्ध×नि:संदिग्ध
  • उत्साही×निरुत्साही
  • स्वार्थी×नि:स्वार्थी
  • आशा×निराशा
  • लोभी×निर्लोभी
  • उपद्रवी×निरुपद्रवी
  • पापी×निष्पाप
  • धनवान×निर्धन
  • आधार×निराधार
  • लक्ष×दुर्लक्ष

आणखी वाचा: १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

एकाच शब्दाला वेगवेगळे उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द

  • सुविचार×कुविचार
  • सकारण×अकारण
  • सशक्त×अशक्त
  • सन्मान×अपमान
  • सकर्मक×अकर्मक
  • सुस्वरूप×कुरूप
  • सुसह्य×असह्य
  • सचेतन×अचेतन
  • सुविख्यात×कुविख्यात
  • सजीव×निर्जीव
  • सुशिक्षित×अशिक्षित
  • सबला×अबला
  • सज्ञान×अज्ञान
  • सुरक्षित×असुरक्षित
  • सत्पात्र×अपात्र
  • सुगंध×दुर्गंध
  • सलग×अलग
  • स्मरण×विस्मरण
  • सुस्थिर×अस्थिर
  • होकार×नकार
  • सुसंगत×विसंगत
  • सुबुद्धी×दुर्बुद्धी
  • सुदैवी×दुर्दैवी
  • सुपूत्र×कुपुत्र
  • सुगम×दुर्गम
  • सुबोध×दुर्बोध
  • सुयश×अपयश
  • सद्गुण×दुर्गुण
  • सुसंगती×कुसंगती
  • स्वाधीन×पराधीन
  • सदय×निर्दय
  • उत्कृष्ट×निकृष्ट
  • स्वकीय×परकीय
  • सुसंवाद×विसंवाद
  • सुकाळ×दुष्काळ
  • अत्यावश्यक×अनावश्यक
  • इहलौकीक×पारलौकिक
  • सुलभ×दुर्लभ
  • उत्कर्ष×अपकर्ष
  • शुभशकुन×अपशकुन
  • सुलक्षणी×अवलक्षणी
  • विजय×पराजय
  • स्वावलंबी×परावलंबी
  • स्वतंत्र×परतंत्र
  • सुचिन्ह×दूषचिन्ह
  • उपकार×अपकार
  • नशीबवान×कमनशिबी
  • सुकर× दुष्कर
  • स्वातंत्र्य×पारतंत्र्य
  • स्वदेश×परदेश
  • उन्नती×अवनती
  • सुवार्ता×दुर्वार्ता
  • अतिवृष्टी×अनावृष्टी
  • आकर्षक×अनाकर्षक

आणखी वाचा: शब्दसमूहाबद्दल एक शब्द

अनियमित विरुद्धार्थी शब्द

  • अवघड×सोपे
  • अलीकडे×पलिकडे
  • अध्ययन×अध्यापन
  • अनुरूप×विजोड
  • अर्थपूर्ण×निरर्थक
  • अटक×सुटका
  • अमृत×विष
  • आसक्ती×विसक्ती
  • आळशी×उद्योगी
  • आनंद×दु:ख
  • आठवणे×विसरणे
  • आकाश×पाताळ
  • आघाडी×पिछाडी
  • आरंभ×अखेर, शेवट
  • आत×बाहेर
  • आशीर्वाद×शाप
  • इकडे×तिकडे
  • उलटा×सुलट
  • उताणा×पालथा
  • उंच×ठेंगू, बुटका,सखोल
  • उपयोगी×निरुपयोगी
  • उष्ण×थंड,शीतल
  • उधल्या×कंजूस
  • ऊन×सावली
  • उदय×अस्त
  • उच्च×नीच
  • उदघाटन×समारोप
  • उद्धट×नम्र
  • उघड×गुप्त, बंद
  • ओला×कोरडा
  • अंधार×उजेड
  • कौतुक×निंदा
  • कृष्ण×धवल
  • कडू×गोड
  • काळा×पांढरा
  • कृतज्ञ×कृतघ्न
  • कठीण×मऊ,कोमल
  • कठीण×मऊ,कोमल
  • कच्चा×पक्का
  • कृत्रिम×नैसर्गिक
  • काळोख×प्रकाश
  • कोवळे×जून,राठ
  • कठोर×मृदू
  • कडक×नरम
  • खोल×उथळ
  • खरेदी×विक्री
  • खिन्न×प्रसन्न,आनंदी
  • खरे×खोटे
  • ग्राह्य×त्याज्य
  • गरीब×श्रीमंत
  • गच्च×सैल,विरळ
  • गुळगुळीत×खडबडीत,खरखरीत
  • गतकाल×भविष्यकाल
  • ग्रामीण×शहरी
  • गिर्हाईक×विक्रेता
  • गुरू×शिष्य
  • घट्ट×सैल
  • चोर×साव
  • चढण×उतरण
  • चूक×बरोबर
  • चपळ×मंद
  • चांगले×वाईट
  • ज्येष्ठ×कनिष्ठ
  • जळणे×विझने
  • जलद×सावकाश
  • जन्म×मृत्यू
  • जमा×खर्च
  • टिकाऊ×कमकुवत
  • टंचाई×विपुलता
  • तेजस्वी×तेजहीन
  • ताजे×शिळे
  • तेजी×मंदी
  • तरुण×म्हातारा
  • तारक×मारक
  • तिक्ष्ण×बोथट
  • थोरला×धाकटा
  • थोर×लहान
  • दोष×गुण
  • दीर्घ×रस्व
  • देव×दैत्य,दानव
  • दुरूस्त×नादुरुस्त
  • दाट×विरळ
  • देशभक्त×देशद्रोही
  • दुष्ट×सुष्ट
  • दिवस×रात्र
  • दूर×जवळ
  • धूर्त×भोळा,मुर्ख
  • धीट×भित्रा
  • न्यूनता×विपुलता
  • नम्रता×उद्धटपणा
  • नाशवंत×अविनाशी
  • नफा×तोटा
  • निर्मळ×मळका
  • नवा×जुना
  • नशीबवान×कमनशिबी
  • निर्भय×भित्रा
  • नक्कल×अस्सल
  • प्रेम×द्वेष
  • प्राचीन×अर्वाचीन
  • प्रचंड×चिमुकले
  • पहिला×शेवटचा
  • प्रगती×अधोगती
  • पूर्व×पश्चिम
  • पाप×पुण्य
  • प्रारंभ×अखेर,शेवट
  • प्रखर×सौम्य
  • फुलने×कोमेजने
  • बोलका×अबोल, मुका,मितभाषी
  • बलाढ्य×किरकोळ
  • बिंब×प्रतिबिंब
  • बरे×वाईट
  • बुद्धी मान×ढ, मठ्ठ,मूर्ख
  • बलवान×दुर्बल
  • भरती×ओहोटी
  • भाग्यवान×दुर्भागी,अभागी
  • भक्कम×कमकुवत
  • भव्य×चिमुकले
  • मंजुळ×कर्कश
  • मालक×नोकर
  • मागचा×पुढचा
  • मर्त्य×अमर
  • मान×अपमान
  • माथा×पायथा
  • मित्र×शत्रू
  • मृदू×टणक
  • मृत×जिवंत
  • मोकळे×बंदिस्त
  • मैत्री×वैर,शत्रुत्व
  • मंद×जलद
  • रडू×हसू
  • रुचकर×बेचव
  • राजमार्ग×आदमार्ग
  • राव×रंक
  • रागीट×प्रेमळ
  • रोख×उधार
  • वडिलार्जित×स्वकष्टार्जित
  • लवकर×उशीरा,सावकाश
  • लांब×आखूड
  • लघु×विशाल,गुरू
  • वृध्द×तरुण
  • वर×खाली
  • विक्षिप्त×समंजस
  • वर× वधू
  • वैयक्तिक×सार्वजनिक
  • शंका×खात्री
  • शहाणा×मूर्ख
  • शूर,धाडशी× भित्रा
  • शाश्वत×अशाश्वत, क्षणभंगुर
  • साम्य×भेद
  • सरळ×वाकडे
  • समोर×मागे
  • स्तुती×निंदा
  • सवाल×जवाब
  • सनातनी×सुधारक
  • सरळ×वाकडा
  • सज्जन×दुर्जन
  • संशय×खात्री
  • सुरेल×कर्कश, भसाडा
  • स्वस्त×महाग
  • सूर्योदय×सूर्यास्त
  • सुबक×बेढब
  • स्वर्ग×नरक
  • सुरुवात×शेवट
  • स्वस्त×महाग
  • सुख×दु:ख
  • सुंदर×कुरूप
  • सौंदर्य×कुरुपता
  • स्थूल×सुक्ष्म
  • हुशार×मठ्ठ
  • हसणे×रडणे
  • हर्ष×खेड
  • हार×जीत
  • हळू×जलद
  • अतिवृष्टी×अनावृष्टी
  • अब्रू×बेअब्रू
  • अभिमानी×निराभिमानी
  • अबोल×वाचाल
  • अपेक्षित×अनपेक्षित
  • अक्कलवानं×बेअक्कल
  • अग्रज×अनुज
  • अनुकूल×प्रतिकुल
  • अनाथ×सनाथ
  • अवघड×सोपे,सुलभ
  • अल्पायुषी×दीर्घायुषी
  • अमावस्या×पौणिमा
  • आस्तिक×नास्तिक
  • आदर×अनादर
  • आनंद×दु:ख
  • आशीर्वाद×शाप
  • आमंत्रित×आगंतुक
  • इष्ट×अनिष्ट
  • उगवतो×मालवतो
  • उदार×कृपन, कंजूष
  • उत्कर्ष×अपकर्ष, ऱ्हास
  • ऐश्चिक×अनैच्छीक
  • ओली ×कोरडी,सुकी
  • कृश×स्थूल
  • कल्याण×कल्याण
  • कृपा×अवकृपा
  • कर्णमधुर×कर्णकटु
  • ग्राह्य×त्याज्य
  • ग्रामिन×नागरी,शहरी
  • गंभीर×अवखळ
  • घट्ट×सैल,पातळ
  • चढाई×माघार
  • चंचल×स्थिर
  • चोर×सव
  • जागृत×निद्रिस्त, निद्रित
  • जहाल×मवाळ
  • तिक्ष्ण×बोथट
  • धूर्त×भोळा
  • धिटाई×भित्रेपणा
  • नीटनेटका×गबाळया
  • नम्रता×उद्धटपणा
  • निष्काम×सकाम
  • नि:शस्त्र×सशस्त्र
  • प्रसरण×आकुंचन
  • प्रसन्न×अप्रसन्न,खिन्न
  • पोक्त×अल्लड
  • पुरोगामी×कर्मठ, प्रतिगामी
  • पुढारी×अनुयायी
  • फिकट×भडक
  • बिकट×सुलभ
  • भरभराट×ऱ्हास
  • मनोरंजक×कंटाळवाणे
  • मंजूर×कर्कश
  • महात्मा×दुरात्मा
  • माजी×आजी
  • रागीट×शांत,प्रेमळ
  • रनशूर×राभिरु
  • राकट×नाजुक
  • रेखीव×ओबडधोबद
  • लाजरा×धीट,निलाजरा
  • लौकिक×दुलौकीक
  • वाजवी×गैरवाजवी
  • वियोग×संयोग
  • विकास×ऱ्हास
  • विजय×पराजय
  • विसंवाद×सुसंवाद
  • शुक्ल पक्ष×कृष्ण पक्ष
  • श्वास×नि:श्वास
  • शुद्ध पक्ष×वद्य पक्ष
  • शेष×नि:शेष
  • सधवा×विधवा
  • सद्गती×दुर्गती
  • सद्गुण×दुर्गुण
  • सजातीय×विजातीय
  • स्वकीय ×परकीय
  • सहेतुक×निर्हेतुक
  • सनातनी×सुधारक
  • सन्मार्ग×कुमार्ग
  • साकार×निराकार
  • सुसंवाद×विसंवाद
  • सुजाण×अजाण
  • सुबुद्धी×दुर्बुद्धी
  • सुसंबद्ध×असंबद्ध
  • अवखळ×गंभीर
  • अवजड×हलके
  • आयात×निर्यात
  • आदी×अंत
  • आंधळा×डोळस
  • आरोहण×अवरोहन
  • आवक×जावक
  • भाग्यवान×भाग्यहीन
  • माहेर×सासर
  • मालक×नोकर
  • मलूल×टवटवीत
  • प्रसिद्ध×अप्रसिद्ध
  • ताजे×शिळे
  • किमान×कमाल
  • खंडन×मंडन
  • खोल×उथळ
  • गमन×आगमन
  • जमा×खर्च
  • ठोक×किरकोळ
  • चाल×अचल
  • संघटन×विघटन
  • दिन×रजनी
  • रेलचेल×टंचाई
  • लवचिक×ताठर
  • विधायक×विघातक
  • वियोग×संयोग
  • थोर×सान,लहान
  • शोक×आनंद
  • सकाळ×संध्याकाळ
  • संकुचित×व्यापक, उदार
  • सुज्ञ×अज्ञ
  • सुरस×निरस
  • पारंपरिक×आधुनिक
  • सजीव×निर्जीव
  • सम×विषम
  • सावध×बेसावध
  • सार्थ×निरर्थ
  • साक्षर×निरक्षर
  • सुपीक×नापीक
  • सुप्रसिद्ध×कुप्रसिद्ध
  • अळणी×खारट
  • आग्रह×अनाग्रह
  • थंडी×उष्णता
  • अंथरूण×पांघरूण
  • रडायला×हसायला
  • कोरडे×ओले
  • असो×नसो
  • योग्य×अयोग्य
  • नंतर×आधी
  • पंधरा×काळा
  • स्वाभिमानी×लाचार
  • पलीकडे×अलीकडे
  • भोळा×लबाड
  • दिन×श्रीमंत
  • पूर्वी×हल्ली
  • अजरामर× नाशिवंत
  • अटक×सुटका
  • ओलखीची×अनोळखी
  • चपळ×मंद
  • पांढरेशुभ्र×काळेकुट्ट
  • कबूल×नाकबूल
  • गुलाम×मालक
  • कळत×नकळत
Previous

मराठी महिन्यांची नावे | Marathi Months Name

१ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार | 1 to 100 Numbers in Marathi

Next

Leave a Comment