जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन! गुजरातला स्पोर्ट्स हब बनवण्याचा अमित शहांचा निर्धार!

| | ,

खेळांच्या दुनियेत भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरात मध्ये बनले आहे.

आज राष्ट्रपतींच्या हस्ते या स्टेडियमचे नामकरण करण्यात आले आहे. (Motera Stadium Renamed as Narendra Modi Cricket Stadium Officially Inaugurated by President Ramnath Kovind)

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू तसेच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते. 

यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियम च्या उद्धघाटनासोबतच सरदार वल्लभ भाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह चे ही राष्ट्रपतींच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

आणखी वाचा: चेतेश्वर पुजारा चेन्नईच्या संघात तर ऍरॉन फिंच अनसोल्ड!

नरेंद्र मोदी स्टेडियम हे ११०००० आसनक्षमता असलेले जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. याआधी हा मान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला होता.

त्याची आसनक्षमता ९०००० आहे.

परंतु त्याला मागे टाकत नरेंद्र मोदी स्टेडियम आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बनले आहे.

या सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये खास सोयी सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियम २३६ एकर परिसरात पसरले आहे.

या मैदानात ११ खेळपट्ट्या (क्रिकेट पिच) बनवण्यात आल्या आहेत.

याशिवाय जिम सोबतच चार ड्रेसिंग रूम बनवण्यात आल्या आहेत.

स्टेडियमला सर्व बाजूनी एलईडी फ्लड लाईट बसवण्यात आल्या आहेत त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे – नाईट कसोटी सामन्यात खेळाडूंना हवेत उंच मारलेला चेंडू स्पष्टपणे दिसू शकेल.

अहमदाबाद बनणार खेळांचे शहर

या उदघाटन समारोहावेळी उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की गुजरात मध्ये सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम व्हावं ही नरेंद्र मोदी यांची ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे स्वप्न होते.

सरदार वल्लभभाई स्पोर्ट्स एन्क्लेव्ह आणि नरेंद्र मोदी स्टेडियम यांसोबतच नानपुरा येथे अजून एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ची बांधणी करण्यात येणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

“फक्त क्रिकेट विश्वासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे सर्वात मोठे स्टेडियम तर आहेच त्याचबरोबर ते जगातील एक आधुनिक स्टेडियम आहे. अहमदाबाद हे देशातील ‘खेळांचे शहर’ ओळख बनवण्याच्या दिशेने अग्रेसर आहे.” अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी यावेळी दिली.

Previous

सहकार्य करा, नाहीतर…अमरावती पोलिसांची जनतेला तंबी!

विराट कोहली बायोग्राफी

Next

Leave a Comment