गणपतीची १०८ नावे | Ganpati Names in Marathi

| |

गणपती हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध आणि अत्याधिक पुजले जाणारे दैवत आहे. सर्व देवतांमध्ये सर्वप्रथम गणेशाची पुजा केली जाते. त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अशीच गणपतीची १०८ नावे (Ganpati Names in Marathi) आपण या लेखात पाहणार आहोत. 

भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र म्हणजे गणपती. (Ganpati All Names in Marathi) हत्तीचे मस्तक आणि मनुष्याचे धड अशी या दैवताची ओळख आहे. संपूर्ण भारतामध्ये गणेशाची मनोभावे पूजा केली जाते.  इतकेच नाही तर नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया (जावा आणि बाली), सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स आणि बांगलादेश; तसेच फिजी, गयाना, मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसह मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गणेशभक्त पसरलेले आहे. गणपतीला कला आणि विद्द्येची देवता मानले जाते. मूषक म्हणजेच उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ला गणेशोत्सव साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी घराघरांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे आगमन होते. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीच्या आवडीच्या पदार्थाचा म्हणजेच मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याची आरती केली जाते. नंतर अकरा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणपतीची वेगवेगळी अशी एकूण १०८ नावे (108 Ganpati Names) आहेत. या लेखात आपण हीच नावे पाहणार आहोत. 

गणपतीची 108 नावे (Ganpati Names in Marathi)

१. ईशानपुत्र (Ishaanputra) : शंकराचे पुत्र

२. उद्दण्ड (Uddanda) : नटखट असणारे

३. उमापुत्र (Umaputra) : पार्वतीचा मुलगा

४. एकदंत (Ekdant) : एकच दात असणारे

५. एकदंष्ट्र (Ekdanshtra) : एकच दात असणारे

६. एकाक्षर (Ekakshar) : एकच अक्षर

७. कपिल (Kapil) : पिवळा रंग असणारे

८. कवीश (Kaveesh) : सर्व कवींची देवता

९. कीर्ति (Kirti) : यशाचे स्वामी

१०. कृपाकर (Kripakar) : सर्वांवर कृपा ठेवणारे

११. कृष्णपिंगाक्ष (Krishnapingaksh) : कृष्णासमान डोळे असणारे

१२. क्षिप्रा (Kshipra) : आराधना करण्यासारखे

१३. क्षेमंकरी (Kshemankari) : क्षमा करणारे

१४. गजकर्ण (Gajkarn) : हत्ती समान कान असणारे

१५. गजनान (Gajnaan) : हत्ती समान मुख असणारे 

१६. गजवक्त्र (Gajvaktra) : हत्ती समान मुख असणारे

१७. गजवक्र (Gajvakra) : हत्ती समान वक्राकार सोंड असणारे

१८. गजानन (Gajaanan) : हत्ती समान मुख असणारे

१९. गणपति (Ganapati) : सर्व गणांचे स्वामी

२०. गणाध्यक्ष (Ganaadhyaksha) : सर्व गणांचे स्वामी

२१. गणाध्यक्षिण (Ganaadhyakshina) : सर्वांचे देवता

२२. गदाधर (Gadaadhar) : ज्यांचे गदा हे शस्र आहे

२३. गुणिन (Gunin) : सर्व गुणांचे स्वामी

२४. गौरीसुत (Gaurisut) : आई गौरीचे पुत्र

२५. चतुर्भुज (Chaturbhuj) : चार हात असणारे

२६. तरुण (Tarun) : ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर

२७. दूर्जा (Doorja) : कधी न पराजित झालेले देव

२८. देवादेव (Devadev) : सर्व देवाचे देव असणारे

२९. देवव्रत (Devavrat) : सर्वांची तपस्या स्वीकारणारे

३०. देवांतकनाशकारी (Devantaknaashkari) : वाईट राक्षसांचे विनाशक

३१. देवेन्द्राशिक (Devendrashik) : सर्व देवांचे रक्षण करणारे

३२. द्वैमातुर (Dwemaatur) : दोन आई असणारे

३३. धार्मिक (Dharmik) : दान करणारे

३४. धूम्रवर्ण (Dhumravarna) : ज्यांचा वर्ण धूम्र आहे

३५. नंदन (Nandan) : शंकराचे पुत्र

३६. नमस्तेतु (Namastetu) : वाइटांवर विजय मिळवणारे

३७. नादप्रतिष्ठित (Naadpratishthit) : ज्यांना संगीत प्रिय आहे

३८. निदीश्वरम (Nidishwaram) : धन संपत्ती देणारे

३९. पाषिण

४०. पीतांबर (Pitaamber) : पिवळे वस्त्र धारण करणारे

४१. पुरुष (Purush) : अद्भुत व्यक्ती

४२. प्रथमेश्वर (Prathameshwar) : सर्वात प्रथम येणारे देव

४३. प्रमोद (Pramod) : आनंद

४४. बालगणपति (Baalganapati) : सगळ्यात प्रिय बाळ

४५. बुद्धिनाथ (Buddhinath) : बुद्धी ची देवता

४६. बुद्धिप्रिय (Buddhipriya) : ज्ञानाची देवता

४७. बुद्धिविधाता (Buddhividhata) : बुद्धीचे स्वामी

४८. भालचन्द्र (Bhalchandra) : ज्याच्या कपाळावर चंद्र आहे

४९. भीम (Bheem) : भव्य

५०. भुवनपति (Bhuvanpati) : देवांचे देव

गणपतीची 108 नावे (Ganpati Names in Marathi)

५१. भूपति (Bhupati) : धरतीचे स्वामी

५२. मंगलमूर्ति (Mangalmurti) : सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे

५३. महाबल (Mahaabal) : अत्यंत बलशाली

५४. मनोमय (Manomaya) : मन जिंकणारे

५५. मूढ़ाकरम (Mudhakaram) : आनंदात असणारे

५६. महागणपति (Mahaaganapati) : देवाधिदेव

५७. महेश्वर (Maheshwar) : संपूर्ण ब्रह्मांडाचे देव

५८. मुक्तिदायी (Muktidaayi) : शाश्वत आनंद देणारे

५९. मूषकवाहन (Mushakvaahan) : ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे

६०. मृत्युंजय (Mrityunjay) : मृत्यूला हरवणारे

६१. यज्ञकाय (Yagyakaay) : सर्व यज्ञा स्वीकार करणारे

६२. यशस्कर (Yashaskar) : यशाचे स्वामी

६३. यशस्विन (Yashaswin) : सर्वात लोकप्रिय देवता

६४. योगाधिप (Yogadhip) : ध्यानाची देवता

६५. रक्त (Rakta) : लाल रंगाच्या शरीराचे

६६. रुद्रप्रिय (Rudrapriya) : शंकरांना प्रिय असणारे

६७. लंबकर्ण (Lambakarn) : ज्याचे कान लांब आहेत

६८. लंबोदर (Lambodar) : मोठे पोट असणारे 

६९. वक्रतुंड (Vakratund) : वक्राकार तोंड असणारे

७०. वरगणपति (Varganapati) : वर देणारे 

७१. अखूरथ (Akhurath) : ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे

७२. अनंतचिदरुपम (Anantchidrupam) : अनंत व्यक्ती चेतना असणारे

७३. अमित (Amit) : अतुलनीय देवता

७४. अलंपत (Alampat) : अनंतापर्यंत असणारे देव

७५. अवनीश (Avanish) : संपूर्ण विश्वाचे स्वामी

७६. अविघ्न (Avighn) : संकटांना दूर करणारे

७७. शुभम (Shubham) : सर्व शुभ कार्यांचे देवता

७८. शूपकर्ण (Shoopkarna) : सुपाएवढे कान असणारे

७९. श्वेता (Shweta) : पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे

८०. सर्वदेवात्मन (Sarvadevatmana) : प्रसादाचा स्वीकार करणारे

८१. सर्वसिद्धांत (Sarvasiddhanta) : सफलतेची देवता

८२. सर्वात्मन (Sarvasiddhanta) : सफलतेची देवता

८३. सिद्धिदाता (Siddhidata) : इच्छा पूर्ण करणारे देवता

८४. सिद्धिप्रिय (Siddhipriya) : इच्छापूर्ती करणारे

८५. सिद्धिविनायक (Siddhivinaayak) : सफलता चे देवता

८६. सुमुख (Sumukha) : शुभ मुख असणारे

८७. सुरेश्वरम (Sureshvaram) : देवांचे देव

८८. स्कंदपूर्वज (Skandapurvaj) : कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे

८९. स्वरुप (Swarup) : सौंदर्याची देवता

९०. हरिद्र (Haridra) : स्वर्ण रंग असणारे

९१. हेरंब (Heramb) : आईचा प्रिय पुत्र

९२. वरदविनायक (Varadvinaayak) : यशाचे स्वामी

९३. वरप्रद (Varprada) : वर पूर्ण करणारे

९४. विकट (Vikat) : भव्य

९५. विघ्नराजेन्द्र (Vighnaraajendra) : सर्व संकटांचे स्वामी

९६. विघ्नविनाशन (Vighnavinashan) : संकटांचा अंत करणारे

९७. विघ्नहर्ता (Vighnahartta) : संकट दूर करणारे

९८. विघ्नविनाशाय (Vighnavinashay) : संकटांचा नाश करणारे

९९. विघ्नहर (Vighnahar) : संकट दूर करणारे

१००. विघ्नराज (Vighnaraaj) : सर्व संकटांचे स्वामी

१०१. विघ्नेश्वर (Vighneshwar) : संकट दूर करणारे

१०२. विद्यावारिधि (Vidyavaaridhi) : विद्या देणारी देवता

१०३. विनायक (Vinayak) : सर्वांचे देवता

१०४. विश्वमुख (Vshvamukh) : संपूर्ण विश्वाचे देवता

१०५. वीरगणपति (Veerganapati) : वीर देवता

१०६. शशिवर्णम (Shashivarnam) : चंद्रासमान वर्ण असणारे

१०७. शांभवी

१०८. शुभगुणकानन (Shubhagunakaanan) : सर्व गुणांची देवता

वाचकहो हि गणपतीची १०८ नावे (Ganpatichi 108 Nave) आहेत. यातील आपल्याला किती नावे माहित होती हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. 

Previous

श्री राम रक्षा स्तोत्र । Ram Raksha Stotra in Marathi

मराठी भजने । Marathi Bhajan Lyrics

Next

Leave a Comment